श्रीमंत शाहू महाराजांना दिला संजय घाटगे गटाने पाठिंबा विरोधक ठरला., उद्धव ठाकरेंच्या आदेशाचे पालन करू

Spread the news

 

श्रीमंत शाहू महाराजांना दिला संजय घाटगे गटाने पाठिंबा

विरोधक ठरला., उद्धव ठाकरेंच्या आदेशाचे पालन करू

व्हनाळीत संजयबाबा घाटगे गटाची बैठक

शाहू महाराजांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्धार

 

कागल, प्रतिनिधी

सध्याच्या बदललेल्या राजकिय
समिकरणांचा आणि परिस्थिीतीचा विचार करता संजयबाबा घाटगे गटाचा राजकिय विरोधक ठरलेला आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश प्रमाण मानून आम्ही काम करू आणि छत्रपती शाहू महाराज यांना प्रचंड मताधिक्क्याने विजय करू असा निर्धार व्हनाळी ता.कागल येथील संजयबाबा घाटगे गटाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आला.

यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थावरून बोलताना संजयबाबा घाटगे म्हणाले, आम्ही राजकारणात कोणावार विनाकारण पलटवार केले नाहीत. आणि कोणापुढेही गुडघेदेखील टेकले नाहीत. आम्ही घेतलेला निर्णय ठाम असून शाहू महाराजांच्या विजयासाठी मी व माझे कार्यकर्ते जिवाचे रान करतील. शाहू महाराजांना मिळालेल्या उमेदवारीमुळे जिल्ह्यात सकारात्मक राजकारणाची नांदी होईल.

श्री. घाटगे पुढे म्हणाले, मला सेनेतून उमेदवारी मिळावी यासाठी सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी प्रचंड प्रयत्न केले, पंरतू पक्षप्रमुख ठाकरे यांनी छत्रपतींच्या गादीचा मान राखण्यासाठी ही जागा काँग्रेसला सोडली, त्यामुळे त्याची खंत नाही. निष्ठावंत कार्यकर्तेच आमचे भागभांडवल आहेत. त्यामुळे नेटाने कामाला लागू असेही ते म्हणाले.

गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे म्हणाले, आमचा राजकिय शत्रू कोण हे आता जवळजवळ ठरलेलं आहे. त्यामुळे ठाकरेंचा आदेश प्रमाण मानून आम्ही शाहू महाराजांच्याच पाठीशी राहू. जिल्हाचा खासदार ठरविण्याची ताकद संजयबाबा घाटगे गटात आहे. ती ताकद या निवडणुकीत आम्ही दाखवून देऊ.

यावेळी विजय जाधव,वैभव आडके,आनंदा भिऊंगडे,दिलीप चौगले,बाबूराव शेवाळे,विलास पाटील,संभाजी भोकरे,जयसिंग टिकले,युवराज कोईगडे,अशोक पाटील,मुकुंद बोडके,मल्हारी पाटील,के.के.पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमास दिनकर पाटील,आनंदा साठे, ए.वाय पाटील,रणजित मुडूकशिवाले,सिद्रमा गंगाधरे ,एम.बी.पाटील,धनाजी गोधडे,विलास पोवार,शिवगोंड पाटील, आल्लाबक्ष शहाणेदिवाण, संभाजी भोसले,राजू भराडे,अनिल देसाई,सुभाष कांबळे,शिवाजी शेळके,रामदास किल्लेदार,एस.टी.पाटील,सुनिल पाटील शिवसैनिक, कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वागत नानासो कांबळे यांनी केले आभार रमेश जाधव यांनी मानले.

छायाचित्र ः सागर लोहार,साके


Spread the news

You may also like

error: Content is protected !!