*श्री महात्मा वाचनालय, बहिरेवाडी येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न*
बहिरेवाडी – येथील श्री महात्मा वाचनालय, शिवाजी तरुण मंडळ व गणपतराव जाधव (वस्ताद )क्रीडा मंडळ, बहिरेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने छ. राजर्षी शाहू महाराज यांच्या 150 व्या जयंती निमित्त ६०% च्या वरती गुण प्राप्त केलेल्या १०वी च्या ३५ व १२ वी च्या १२ गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.याच कार्यक्रमात सौ. प्राजक्ता जाधव यांची पुरवठा निरीक्षक पदी व कु अंजली गौड कालवा निरीक्षक, पदी निवड तसेच कु. श्वेता भोई हिची कनिष्ठ अभियंता पदी निवड व मा. संपतराव चव्हाण याची शरद साखर कारखाना कामगार युनियन उपाध्यक्ष पदी निवड झालेबद्दल सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास अध्यक्ष श्रीमती प्रमिला जाधव (सरपंच बहिरेवाडी )तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. कैलास कोडग (पोलीस निरीक्षक, कोडोली पोलीस स्टेशन, कोडोली ),मा. प्रा. डॉ. ए. व्ही. पाटील (प्रवेश प्रiक्रिया प्रमुख टी के. आय. इ. टी. वारणानगर )व मा. भास्करराव निकम (अध्यक्ष – बाबू पार्क विकास फौंडेशन, बहिरेवाडी )उपस्थित होते. तसेच समारंभ मा. युवराज भोसले (उपसरपंच बहिरेवाडी ), मा. संजय खोत. (माजी सैनिक )यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.समारंभाचे प्रास्ताविक ग्रंथमित्र प्रा. के. जी. जाधव (माजी उपप्राचार्य वारणा महाविद्यालय ) यांनी केले. मा. कैलास कोडाग यांनी आपल्या मनोगतामध्ये वाचनालयास रु 5000/- देणगी देत असल्याचे जाहीर केले. तसेच डॉ. पाटील यांनी विद्यार्थ्यांना 10 वी 12 वी कोणते शिक्षण घ्यावे याबद्दल मार्गदर्शन केले.मा शिवराज जाधव सूत्रसंचालन केले व श्री. संपतराव चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी ज्ञानदिप कोचिंग क्लासेस, बहिरेवाडी चे उदघाट्न करण्यात आले. समारंभ यशस्वी करणेसाठी प्रा. संदीप जाधव,श्री. सुरज खोत प्रा. राम करे, श्री संजय जाधव ,श्री. युवराज जाधव, श्री शशिकांत भोसले, प्रदीप जाधव कु. रवि देवकर, ग्रंथपाल श्री. लखन करे, श्री. अशोक गोडे व सहकारी या सर्वांचे सहकार्य लाभले. समारंभास बहिरेवाडी मधील सर्व संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थी व पालक मोठया संख्येने उपस्थिvत होते.
previous post