श्री दत्ताबाळ समाधी मंदिर प्रतिष्ठानच्यावतीने 84 वा जयंती उत्सव
कोल्हापूर
रुईकर कॉलनी येथील कालीकृपा श्री दत्ता बाळ समाधी मंदिर प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवार दिनांक 3 एप्रिल रोजी श्री दत्ताबाळ यांच्या जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रुईकर कॉलनी येथील कालीकृपा येथे सकाळी सात वाजता आरती, साडेसात वाजता अभिषेक, साडेआठ वाजता गायत्री हवन आणि दहा वाजता व्याख्यान होणार आहे. पावित्र्य हेचि प्रमाण या विषयावर प्रा. प्रमोद झावरे हे व्याख्यान देणार आहेत. सायंकाळी सात वाजता प्रार्थना होणार आहे.
या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन कालीकृपा श्री दत्ताबाळ समाधी मंदिर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मंजिरी अजित मोरे, उपाध्यक्ष नितीन पाटील व सचिव प्रा. जयकुमार देसाई यांनी केले आहे.