श्री छत्रपती राजाराम सहकारी  साखर कारखान्याची ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत , विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांकडून एकमुखी मंजुरी

Spread the news

श्री छत्रपती राजाराम सहकारी  साखर कारखान्याची ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

, विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांकडून एकमुखी मंजुरी

व्यक्तीद्वेषातून कारखान्याची नाहक बदनामी

अध्यक्ष अमल महाडिक  यांचा आरोप

कोल्हापूर

कसबा बावडा येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी  साखर कारखान्याची ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली. विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी  मंजुरी दिली. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडिक होते. दरम्यान, व्यक्तीद्वेषातून श्री छत्रपती राजाराम सहकारी  साखर कारखान्याची विरोधकांकडून नाहक बदनामी केली जात आहे. अशी बदनामी किंवा खोटे आरोप यापुढं खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा महाडिक यांनी दिला.

कसबा बावडा इथल्या श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज कारखाना कार्यस्थळावर पार पडली. सकाळी ११ वाजता सभेच्या कामकाजाला कारखाना अध्यक्ष अमल महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी अध्यक्ष, तज्ञ संचालक महादेवराव महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरूवात झाली. व्यासपीठावर सर्व संचालक उपस्थित होते. तर विरोधी सदस्य आणि संचालकांनी सभेच्यापूर्वी कारखान्यासमोरच घोषणाबाजी केली. प्रत्यक्षात सभेला प्रारंभ झाल्यानंतर सभागृहात विरोधी सदस्य उपस्थितच नव्हते.

सत्ताधारी गटाच्या सभासदांनी हातामध्ये मंजुर मंजुरचे फलक तसंच महाडिक पितापुत्रांचे छायाचित्र असणारे फलक आणले होते. महाडिक समर्थकांनी जोरदार घोषणा देत सभागृह दणाणून साेडलं.  कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांनी, प्रास्ताविक भाषण करून सभेच्या कामकाजाचं स्वरूप सांगितलं. यानंतर अध्यक्ष अमल महाडिक यांचं भाषण झालं. राजाराम कारखान्याचा कारभार पारदर्शीपणे सुरू असल्यानं, विरोधकांचा पोटशूळ उठला आहे. कारखान्यानं हाती घेतलेल्या सहवीज निर्मिती प्रकल्पासह अन्य सर्व प्रकल्प आणि योजना येत्या वर्षभरात पूर्ण केल्या जातील, असं अमल महाडिक यांनी जाहीर केलं.
सभेच्या पार्श्‍वभूमीवर पत्रकबाजी करून कारखान्याची नाहक बदनामी करणार्‍या तसंच कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांच्यावर भ्याड हल्ला करणार्‍या सभासदांचा


Spread the news

You may also like

error: Content is protected !!