शिव-महोत्सव’चे विसावे पर्व उद्या रंगणार पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांना जीवनगौरव पुरस्कार

Spread the news

‘शिव-महोत्सव’चे विसावे पर्व उद्या रंगणार

  1. U­

 


पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांना जीवनगौरव पुरस्कार

  •  

कोल्हापूर, दि. ८ मार्च: ‘माणसातला कलाकार शोधणारा महोत्सव’ म्हणून गेल्या १९ वर्षांत सर्वदूर वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ‘शिव महोत्सव’चे २० वे पर्व रविवारी (दि.९) सायंकाळी ४ वाजता शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊ साहेब सभागृहात होणार आहे. यंदाचा जीवनगौरव पुरस्कार दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांना प्रदान करण्यात येणार आहे.अशी माहिती शिवाजी विद्यापीठ आजी-माजी स्नेहमेळावा कृती समितीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. प्रविण कोडोलीकर, मुख्य समन्वयक अॅड. मंदार पाटील यांनी दिली.
महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी‌.टी‌ शिर्के अध्यक्षस्थानी असतील.
यंदा ‘शिव महोत्सव’चे २० वे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे महोत्सवांतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा, शिव पुरस्कार वितरण व भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यंदाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजेश क्षीरसागर, सामाजिक व शैक्षणिक कार्यकर्त्या विद्याताई पोळ, कोल्हापूर विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. धनराज नाकाडे, शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, परीक्षा संचालक डॉ. अजितसिंह जाधव, डॉ. प्रियांका धनवडे, डॉ.सरदार जाधव,विवेकानंद शिक्षण संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, केशव गोवेकर ,मिलिंद सुर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

यावर्षी सारेगमप फेम गायक राहुल सक्सेना, गायिका मधुरा कुंभार, लोकशाहीर रणजित आशा अंबाजी कांबळे आणि सँड आर्टिस्ट अमित माळकरी यांचे सादरीकरण प्रमुख आकर्षण असणार आहे. त्याचप्रमाणे डॉ. सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांचा शिवसोहळा, श्रीजा लोकसंस्कृती फाऊंडेशन (नृत्यदिग्दर्शक चंद्रकांत पाटील) आणि रिव्हॉल्युशन डान्स अॅकेडमी (नृत्यदिदर्शक रोहित पाटील) यांचे नृत्याविष्कारही दर्शकांना पाहावयास मिळणार आहेत.
शिव महोत्सवाच्या यशस्वितेसाठी अभिजीत राऊत, अजिंक्य शिंदे यांच्यासह प्रवीण साळुंखे, ओंकार शेट्ये, महेश राठोड, पृथ्वीराज घोडके, अक्षय देसाई आणि कृती समिती सदस्य परिश्रम घेत आहेत.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!