मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारच्या निर्णयाचे शिवसेनेकडून साखर – पेढे वाटून स्वागत*

Spread the news

*मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारच्या निर्णयाचे शिवसेनेकडून साखर – पेढे वाटून स्वागत*

कोल्हापूर दि.०४ : केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. केंद्र सरकारच्या या निर्णयाने मराठी भाषा सातासमुद्रापार जगभरात आणखी जास्त वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचणार आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय महाराष्ट्राच्या साहित्यांकांना, तमाम मराठी जनतेला प्रोत्साहन देणारा आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयाचे आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कोल्हापूर शिवसेनेच्या वतीने साखर – पेढे वाटून स्वागत करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, महिला आघाडीच्या सौ.मंगलताई साळोखे, पूजा भोर, मंगलताई कुलकर्णी, राधिका पारखी, प्रसाद चव्हाण, अर्जुन आंबी, प्रभू गायकवाड, सचिन पाटील, कपिल सरनाईक, बबनराव गवळी, श्रीकांत मंडलिक, सुरज धनवडे, विकास शिरगावे, रियाज बागवान, सुभाष भोसले यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*मायमराठीच्या इतिहासातील सुर्वण दिवस : राजेश क्षीरसागर*

आपली मराठी जगभर पोहोचावी. आपली संस्कृती आणि सांस्कृतिक वारसा जगातील मराठी माणसापर्यंत पोहोचावी. ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने मराठी भाषेला सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला. हा मायमराठीच्या इतिहासातील सुवर्ण दिवस आहे. याचा सर्वस्वी आनंद आणि अभिमान आहे. समस्त मराठी जणांसाठी हा आनंदाचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जाहीर आभार मानत असल्याची प्रतिक्रिया राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली


Spread the news

You may also like

error: Content is protected !!