शिरोळकरांनी गणपतराव पाटील यांना दिले शिरोळमधून उच्चांकी मतदान देण्याचे आश्वासन
शिरोळ शहर व उपनगरात मोटरसायकल रॅलीला प्रचंड प्रतिसाद”
शिरोळ/प्रतिनिधी:
महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचारासाठी आज शिरोळ शहर व उपनगरात मोटरसायकल रॅली काढण्यात आली. विविध संस्थांचे पदाधिकारी, तरुण मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, त्याच पद्धतीने ग्रामस्थांनी या रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत करून पाठिंबा दिला. तसेच शिरोळमधून उच्चांकी मतदान देण्याचे आश्वासनही गणपतराव पाटील यांना दिले. या रॅलीमध्ये आबालवृद्ध, महिला, तरुणांचा मोठा सहभाग होता.
गल्ली गल्लीमध्ये तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उमेदवार गणपतराव पाटील यांचे स्वागत केले. कित्येक ठिकाणी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. आबालवृद्ध, महिलांनी गणपतराव पाटील यांचे स्वागत करून त्यांच्याशी हितगुज गेले. गणपतराव पाटील यांनीही सर्वांची विचारपूस करून महाविकास आघाडीच्या पाठीशी राहून शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी मला एक वेळेस संधी द्यावी असे आवाहन केले. यावेळी महाविकास आघाडीचा विजय असो, गणपतराव पाटील दादा यांचा विजय असो, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. शिरोळकरांनी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या मोटरसायकल रॅलीला दिला.
शिरोळ तालुक्यामध्ये विविध ठिकाणी पदयात्रा आणि कॉर्नर सभेला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्याच पद्धतीने शिरोळकरांनी सुद्धा या मोटरसायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत गणपतराव पाटील यांचे जल्लोषात स्वागत करत त्यांना पाठिंबा दिला आणि निवडून आणण्याचा निश्चय केला.
या मोटरसायकल रॅलीला श्री दत्त कारखाना गेट पासून सुरुवात झाली. यानंतर ही रॅली गणेश नगर, शिवाजीनगर, समतानगर, महात्मे मळा, क्रांती चौक, विजयसिंह नगर, साईनगर, बिरोबा माळ, कोरवी गल्ली, कोळी गल्ली, नवशक्ती मंडळ, एस.टी. स्टँड, कुरणे गल्ली, अजिंक्यतारा मंडळ, जय शिवराय मंडळ, जावई वाडी, शिवशक्ती मंडळ, जय हनुमान मंडळ, जगदाळे गल्ली, गावडे गल्ली, बाजारपेठ, बाळ शिवाजी मंडळ, ब्राह्मणपुरी, काळे गल्ली, जनता हायस्कूल, जिजाऊ नगर, शाहूनगर, म्हाळसाकांत माने मळा, रोहिदास मंडळ, संगमनगर आदी विविध भागांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला.
शिरोळ तालुक्यामध्ये विविध ठिकाणी पदयात्रा आणि कॉर्नर सभेमध्ये प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे, त्याच पद्धतीने शिरोळकरांनी सुद्धा या मोटरसायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत गणपतराव पाटील यांचे जल्लोषात स्वागत करत त्यांना पाठिंबा दिला आणि निवडून आणण्याचा निश्चय केला.
श्री दत्त कारखान्याचे संचालक अनिलराव यादव, दरगू गावडे, मंजूर मिस्त्री, पृथ्वीराजसिंह यादव, फतेलाल मिस्त्री, धनाजीराव पाटील नरदेकर, पंडितराव काळे, वैभव उगळे, बापू गंगधर, विठ्ठल पाटील, आप्पा गावडे, धोंडीराम दबडे, परवेज मिस्त्री, पांडुरंग माने, गजानन कोळी, महेश पाटील, विराजसिंह यादव, छोटू पुंदे, दिलीपराव माने, योगेश पुजारी, गजानन संकपाळ, विजय आरगे, बंटी देसाई, रणजीत जगदाळे, बापूसो धनगर, डी. बी. चव्हाण, बाळासाहेब कोळी, रहीम मिस्त्री, संभाजीराव जगदाळे, भालचंद्र ठोंबरे, दिगंबर सकट, विक्रमसिंह जगदाळे, वैशाली जुगळे, रुपेश मोरे, प्रतीक धर्माधिकारी, खलील कुरणे यांच्यासह मविआचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिरोळकर मतदार प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित होते.