* शिरीष सप्रे यांचे निधन*
कोल्हापुर
सुप्रसिद्ध उद्योजक व कोल्हापूरच्या सांस्कृतिक ,सामाजिक क्षेत्रातील अग्रणी शिरीष उर्फ प्रमोद विनायक सप्रे यांचे आज सकाळी ( दि २६ जुन) रोजी सकाळी ७ वा आकस्मिक निधन झाले .
शिरीष सप्रे( वय ६८) यश मेटालिक्स व सप्रे ॲाटो एक्सलन्सरीज प्रा लि. या संस्थेचे चेअरमन होते. औद्योगिक क्षेत्रासोबतच सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचा लक्षवेधी वावर होता. गुणीदास फौंडेशनचे ते अध्यक्ष होते .झाकीर हुसेन,राजन-साजण मिश्रा,हरिप्रसाद चौरसिया,सुरेश तळवलकर,शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ,सौमित्र तथा किशोर कदम अशा अनेक कलावंतांशी त्यांचा निकटचा स्नेह होता.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त दहा सामाजिक संस्थांना प्रत्येकी पंच्याहत्तर हजारांची देणगी त्यांनी दिली होती . अनेक ठीकाणी त्यांनी वृक्षारोपण केले आहे .
औद्योगिक क्षेत्रात त्यांची कामगिरी आणि व्यावसायिक सचोटीमुळे जीएसटी नियमित व चोख भरणारे उद्योजक म्हणुन जीएसटीनेही त्यांचा सन्मान केला . अमेरीकन कंपनी कॅटलफीलरने त्यांना गौरवले होते .
त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगी,जावई बंधु असा परिवार आहे .
—————॰॰॰—————-