एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघाची रोबोवेदा २०२४ मध्ये चमकदार कामगिरी

Spread the news

 

 

एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघाची रोबोवेदा २०२४ मध्ये चमकदार कामगिरी

 

पुणे

हैदराबादयेथील श्रीनिधी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी येथे झालेल्या रोबोवेदा २०२४ मधील
प्रतिष्ठेच्या रोबो-सुमो स्पर्धेत एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एव्हिओट-ओ-नेचर संघाने
उपविजेतेपद पटकावत राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. भारतभरातील ७६ संघांचा या स्पर्धेत
सहभाग होता .
प्रणव बिराडे, पांडुरंग जावळे, आनंद मराठा, आदित्य सोनवणे, करण माने, अथर्व पाटील आदींच्या पथकाने
उत्कृष्ट कौशल्य व सांघिक कामगिरीचे प्रदर्शन केले.
एआयएसएसएमएस सोसायटीचे सचिव श्री .मालोजीराजे छत्रपती यांनी या कामगिरीचे कौतुक करत
उपस्थितांचे परिश्रम व यशाबद्दल अभिनंदन केले.
एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. बोरमणे यांनी विद्यार्थ्यांच्या
समर्पणाचे कौतुक केले आणि व्हायब्रंट स्टुडंट क्लबच्या माध्यमातून सह-अभ्यासक्रमातील उत्कृष्टतेला चालना
देण्याच्या संस्थेच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकला.

इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकॉम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. एस. बी. धोंडे व प्राध्यापक सल्लागार
प्रा.नितीन मावळे यांनी संपूर्ण स्पर्धेत संघांना मोलाचे मार्गदर्शन केले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!