शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी विवेकवादी तत्वे अच्युत  गोडबोले    श्री  स्वामी  विवेकानंद  शिक्षण  संस्थेत  ‘ ज्ञानशिदोरी दिन ’ संपन्न

Spread the news

 

 

शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी विवेकवादी तत्वे अच्युत  गोडबोले   

श्री  स्वामी  विवेकानंद  शिक्षण  संस्थेत   ज्ञानशिदोरी दिन  संपन्न

 

कोल्हापूर दि.17 : शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी आयुष्यभर विवेकवादी तत्वे जोपासली.  त्यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी असून त्यामुळे श्री स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था महाराष्ट्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे.  प्राचार्य अभयकुमार साळुंखे  हे डॉ.बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वसा व वारसा गेली 40 वर्षे समर्थपणे सांभाळत आहेत. त्यामुळे ही संस्था प्रगतीपथावर आहे.

          जगप्रसिध्द व्याख्याते व लेखक व डॉ. अच्युत गोडबोले यांनी माझा लेखन प्रवास या विषयावर मत मांडताना  सांगितले की, त्यांनी अनेक क्षेत्रात लेखन केले असले तरी मी कोणत्याही विषयातील तज्ञ आहे असे मानत नसून स्वत:ला विद्यार्थीच मानतो.   डॉ.गोडबोले याना अनेक विषयाची जिज्ञासा आहे.   विज्ञान तंत्रज्ञानापेक्षा संगीतादी कला सुध्दा तितक्याच महत्वाच्या आहेत.  माणसाला अनेक क्षेत्रातील गोष्टींच्या निर्मितीविषयी कुंतुहल असायला हवे.   डॉ. गोडबोले यांनी आदिवासींना न्याय देण्यासाठी चळवळ सुरु केली.  प्रसंगी तुरुंगवासही भोगला.  स्वत:च्या जीवनातील संघर्षाला तोंड देत पुढील वाटचाल सुरुच ठेवली. त्यांच्या पुस्तक निर्मितीच्या अनेक बीजकथा त्यांनी सांगितल्या. आपल्या पुस्तकांमुळे अनेकांचे आयुष्य बदलले असे त्यांनी भाषणात सांगितले.

डॉ.गोडबोले येथील विवेकानंद कॉलेजने आयोजित केलेल्या ज्ञानशिदोरी दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे होते.

          अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य अभयकुमार साळुंखे म्हणाले की, वाचन संस्कृती वाढावी यासाठी ज्ञानशिदोरी हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.  शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यानी माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे हा विचार सर्वदूर पसरवला आहे. धर्म, जातीभेद विसरुन मानवतेसाठी जगा हा बापूजींचा संदेश होता.  डॉ. गोडबोले यांच्या व्याख्यानातून सर्व विषयांतील ज्ञान व माहिती मिळते.  त्यांची पुस्तके वाचून जीवन जगण्याचा आशावाद  व प्रेरणा शिक्षकांनी व  विद्यार्थ्यांनी घ्यावी.

          यावेळी प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त्‍ विवेकानंद कॉलेजच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन केले गेले. तसेच महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाने ज्ञानशिदोरी उपक्रमांतर्गत पुस्तके जमा करुन घेऊन गरजूंना त्याचे वाटप करण्यात आले.  तसेच न्यू मॉडेल हायस्कूलच्या विद्यार्थिनीनी पुस्तके व गुलाबपुप्ष्‍ दिली व विवेकानंद कॉलेजच्या विद्यार्थिनींनी औक्षण केले.

          याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्राचार्या सौ.शैलजा साळुंखे म्हणाल्या, प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या बरोबर सांसरिक वाटचाल करताना व्यक्तीस्वातंत्र्य मिळाल्याने माझे कर्तृत्व्‍ सिध्द करता आले. त्यांनी माझ्या सर्व सुखदु:खात साथ दिली आहे.   त्यांना मी वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्य चिंतीते.

 

विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य  डॉ.आर.आर. कुंभार यांनी करुन दिला.  कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन,  शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे रचित संस्था प्रार्थना व प्रा.महेश हिरेमठ यांच्या भक्तीगीत गायनाने झाली. कार्यक्रमाचे आभार संस्थेच्या सेक्रेटरी मा.प्राचार्या सौ. शुभांगी गावडे यांनी मानले

याप्रसंगी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे, प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे (सहसचिव अर्थ)  प्राचार्य सिताराम गवळी (सहसचिव प्रशासन), मा.श्रीराम साळुंखे, कोल्हापूर विभागप्रमुख,   मा.बी.बी.अपराध, मा.आर.के.भोसले, प्राचार्य विरेन भिर्डी, प्राचार्य धनराज भोसले, रजिस्ट्रार श्री.आर.बी.जोग , संस्थेतील आजी माजी पदाधिकारी, हितचिंतक , गुरुदेव कार्यकर्ते, विद्यार्थी, विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!