भर पावसात सभा झाली की निकाल चांगला लागतो
शरद पवार यांचा टोला
महाराष्ट्रात आता परिवर्तन अटळ
पवारांच्या भर पावसात झालेल्या सभेने हवा फिरणार?
कोल्हापूर
सातारा जिल्ह्यात शरद पवारांची भर पावसात सभा झाली आणि या सभेने संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय हवाच फिरली याच पार्श्वभूमीवर इचलकरंजीत पवारांची भर पावसात जंगी सभा झाली यामुळे पवारांची ही सभा आता वातावरण फिरवणार का याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे दरम्यान
भिजत सभा झाली की निवडणुकीचा निकाल चांगला लागतो असा टोला मारत पवारांनी ही वातावरण निश्चित बदलेल असं जणू भाकीतच केलं
महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी शुक्रवारी कोल्हापुरात तीन सभा घेतल्या. इचलकरंजीत मदन कारंडे, चंदगडला नंदाताई बाभुळकर आणि कागलला समरजीत घाटगे यांच्या प्रचारासाठी ते कोल्हापुरात आले होते. सकाळी सांगली जिल्ह्यातील तासगाव मतदारसंघातील रोहित पाटील यांची सभा आटोपून ते इचलकरंजीत आले. तेथे सभा सुरू झाल्यानंतर हलका पाऊस होता. पण; नंतर पवारांच्या भाषणावेळी जोरदार पावसाच्या सरी कोसळू लागल्या. भर पावसात ही उपस्थित कार्यकर्त्यांनी पवारांच्या घोषणाबाजी पवारांच्या नावाने घोषणाबाजी केली यामुळे भाषण आटोपते न घेता पवारांनी विरोध विरोधी उमेदवार जोरदार टीका तर केलीच शिवाय पाऊस आणि सभेचं नातंही सांगितलं.
भर पावसातील सभेत बोलताना शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाची सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो. पवारांनी जाहीर सभेत असं सांगताच समोरुन एकच जल्लोष झाला. यावेळी समोर उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी शिट्ट्या आणि टाळ्यांमध्ये जोरदार प्रतिसाद देत शरद पवार यांच्या सभेला पावसामध्येही जाण आणली.
महाराष्ट्राचा पाळणा कोणाच्या हातात द्यायचा याचा निर्णय घ्यायचा आहे असे सांगून
पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे आपण कारभार कोणाच्या हातात द्यायचं हे ठरवायचं आहे. सत्तेत बदल केल्याशिवाय पर्याय आपल्यासमोर दिसत नाही आणि सत्ता बदलण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.
इचलकरंजी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे मदन कारंडे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा हे सांगण्यासाठी मी येतो आलो आहे असे आवाहन पवार यांनी केले.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या सभेला जिल्हाध्यक्ष व्हीबी पाटील यांच्यासह शिरोळ मतदार संघाचे उमेदवार गणपतराव पाटील, हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजू बाबा आवळे यांच्यासह व्यासपीठावर काँग्रेसचे शशांक बावस्कर, संजय कांबळे, राहुल खंजिरे, प्रकाश मोरबाळे, सागर चाळके, अजित मामा जाधव, अशोकराव जांभळे, सुहास जांभळे, हिंदुराव शेळके, उदयसिंह पाटील, बादशहा बागवान, राजू आलासे, उदयसिंह पाटील, सौ स्मिता तेलनाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हिंदुराव शेळके शशांक बावस्कर उदयसिंह पाटील सागर चाळके प्रकाश मुरबाळे रणजीत जाधव या सर्वांनी गेल्या 40 वर्षात आव्हाळे कुटुंबीयांनी या इचलकरंजीला फसवण्याचे काम केले आहे कोणतेही काम त्यांनी केले नाही सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता मिळवण्याचे काम या आवाडे कुटुंबीयांनी केले आहे असे म्हणत त्यांच्या घराणेशाहीवर टीका केली.
उमेदवार मदन कारंडे बोलताना म्हणाले भर पावसात आपण सर्वजण उपस्थित राहिलात शरद पवार साहेबांची हजेरी लागल्यानंतर वरून राजांनी हजेरी लावली
यामुळे इचलकरंजीत आता परिवर्तन होणार हे अटळ आहे. हे शहरातील घराणेशाही संपवण्यासाठी माझ्याबरोबर हिंदुराव शेळके, संजय कांबळे, शशांक बावचकर हे सर्वजण एकत्र आले यांना मी धन्यवाद देतो. मला आपण सर्वांनी प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन मदन कारंडे यांनी यावेळी केले.