शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात 12 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महा धरणे आंदोलन आमदार सतेज पाटील यांची माहिती

Spread the news

 

शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात 12 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महा धरणे आंदोलन आमदार सतेज पाटील यांची माहिती

 

कोल्हापूर

शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्याचे राज्य सरकार सांगत असताना दुसरीकडे पर्यावरण विभागाकडे या महामार्गाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविले आहे, यामुळे राज्य सरकार शेतकऱ्यांचा विश्वासघात करत असल्याचा आरोप, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेचे आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. शक्तिपीठ विरोधात आता रस्त्यावरील लढा आणखी तीव्र करण्याबरोबरच १२ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाधरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

शक्ती पीठ महामार्गाला विरोध दर्शवण्याकरिता शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीची शासकीय विश्रामगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्ह्णाले, शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याचे खोट सांगून, राज्य सरकारन शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. त्यामुळं आता, रस्त्यावरील आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत सर्वच शेतकऱ्यांनी, शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी आपापल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.  नको असलेला महामार्ग जनतेवर लादला जात असल्याने, या महामार्गातील सरकारचा लाडका कॉन्ट्रॅक्टर कोण आहे. असा सवालही त्यांनी उपस्थित करत, राज्य सरकारवर टिका केली.12 तारखेला होणाऱ्या महाधरणे आंदोलनानंतर लवकरच या संदर्भात कोल्हापूर मध्ये आम्हीं राज्यव्यापी परिषद घेणारं असल्याचंही आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला गिरीश फोंडे, शिवाजी मगदूम, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, सम्राट मोरे, के बी पाटील, शिवाजी कांबळे, आनंदा पाटील आदी उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!