शक्तिपीठ महामार्ग विरोधात शेतकऱ्यांचे आत्मकलेश आंदोलन ….
महा धुरळा न्यूज साठी गारगोटी प्रतिनिधी:राजेंद्र यादव. सरकार आज एक बोलत असते उदयाला एक बोलते त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणाचे तोंडाकडे पहायचे असा सवाल आज भुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला. गारगोटी येथील हुतात्मा क्रांती चौकात आज नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणून आज आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. यावेळी आजरा भुदरगड कागल तालुक्यातील व जिल्ह्यातील विविध गावातील शेतकरी हजर होते. आमची पिकाऊ जमीन गेली तर आम्हा शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागणार म्हणून आज शेतकऱ्यांनी प्रतीकात्मक आत्महत्या करून हे आंदोलन केले. यावेळी बोलताना आंदोलनाचे मार्गदर्शक कॉ.सम्राट मोरे यांनी सरकार मधील मंत्री दररोज वेग वेगळी भाषणे करत आहेत.मुख्यमंत्री वेगळी भाषा बोलत आहेत खरं तर सरकारला वठणीवर आणण्याची गरज आहे काही ही झाले तरी चालेल,शेतकऱ्यांचा प्राण गेला तरी चालेल पण कोल्हापूर जिल्ह्यातून हा महामार्ग जाऊ देणार नाही अशी भूमिका घेतली.विजय देवणे बोलताना म्हणाले की आता आपली ही लढाई आरपारची आहे.हे सरकार अदानी अंबानीचे आहे त्यांना शेतकऱ्यांशी काहीही देणे घेणे नाही या गेंड्याचे कातडीचे सरकारला वठणीवर आणण्यासाठी याहून मोठे आंदोलन आपण उभे केले पाहिजे.आंदोलन प्रसंगी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.आंदोलन स्थळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी कॉम्रेड राम कळंबेकर ,ठाकरे गट उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष शामराव देसाई, काँग्रेस चे युवक नेते राहुल देसाई ,गिरीश फोंडे, कॉ.सतीशचंद्र कांबळे, काँग्रेस तालुका उपाध्यक्ष संदीप देसाई,प्रहार संघटनेचे मच्छिंद्र मुगडे,म्हसवे गावचे सरपंच सर्जेराव देसाई ,सोनारवाडी गावचे सरपंच ऋषिकेश पाटील, के के भारतीय, कॉम्रेड राजेंद्र यादव यांच्या सह जिल्ह्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.