शाहूराजांनी केलेल्या उपकाराची परतफेड आम्ही करणारच सिध्दार्थनगर वासियांनी मधुरिमाराजे यांना दिला शब्द

Spread the news

 

शाहूराजांनी केलेल्या उपकाराची परतफेड आम्ही करणारच

सिध्दार्थनगर वासियांनी मधुरिमाराजे यांना दिला शब्द

कोल्हापूर, प्रतिनिधी
संस्थानकाळात राजर्षी शाहूराजांनी सिध्दार्थनगर वसवले आणि आमच्या समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. लोकांनी आम्हाला सामावून घ्यावे यासाठी दसऱ्याची पालखी आमच्या घरादारावरून पुढे नेली. शाहू राजांनी आमच्यावर अनंतकृपा केली आहे. राजाच्या उपकाराचे ऋण काहीअंशी फेडण्याची संधी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मिळाली आहे. छत्रपती शाहू महाराजांना लोकसभा निवडणुकीत विजयी करून शाहू राजांनी केलेल्या उपकाराची परतफेड करू असा शब्द सिध्दार्थनगर वासियांनी छत्रपती मधुरिमाराजे यांना दिला.

लोकसभा निवडणुकीसाठी श्रीमंत शाहू महाराज काँग्रेसपक्षाकडून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी मधुरिमाराजे यांनी सिध्दार्थनगर भागातील नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. राजर्षी शाहू महाराजांनी वसवलेले सिध्दार्थनगर हे आम्ही छत्रपती कुटुंबीय आमचे दुसरे घरच मानतो. त्यामुळे शहरातील प्रचाराचा शुभारंभ या घरापासूनच केल्याची भावना मधुरिमाराजे यांनी व्यक्त केली.

सिध्दार्थनगरमधील शाहू समाज मंदिरपासून मधुरिमाराजे यांनी प्रचारफेरीला सुरूवात केली. याठिकाणी महिलांनी हळदीकुंकू लावून मधुरिमाराजे यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना मधुरिमाराजे म्हणाल्या, सिध्दार्थनगरला शाहूराजांचा सहवास लाभला आहे. त्यामुळे इथे आल्यानंतर एक वेगळीच आत्मीयता मिळते. छत्रपती शाहू महाराजांच्या विजयासाठी सिध्दार्थनगरातील नागरिकांची साथ मिळाली तर खऱ्या अर्थाने छत्रपती घराणे आणि सिध्दार्थनगरवासिय यांच्यातील ऋणानुबंध अधिक दृढ होती.

यावेळी मधुरिमाराजे यांनी सिध्दार्थनगर परिसरातील शाहू समाज मंदिर परिसर, कट्टा ग्रुप, बुध्द विहार, बाबा ग्रुप, चाफा झाड परिसर, सत्याई गल्ली, ब्रम्हपुरी चर्च परिसर, शिवाजी पुलाजवळील मुळे परिवार, फकीर वाडा, जुना बुधवार तालीम परिसर, दवीमुखी मारूती मंदिर तोरस्कर चौक परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, महिला कार्यकर्त्या यांच्यासमवेत नागरीकांच्या भेटी घेतल्या.

यावेळी   माजी नगरसेविका लता कदम, स्वाती काळे, अनुजा कांबळे, विनोद कांबळे, अतुल गवळी, करण भोसले, अविनाश बनगे, गीता समुद्रे, मंगेश कांबळे, अमर कांबळे, निवास कांबळे, सनीराज बुधगावकर, माजी नगरसेवक जय पटकारे, शरद अष्टेकर, संदीप माळी, माजी नगरसेवक धनंजय सावंत, सुशील भांदिगरे, मुसाभाई कुलकर्णी, जुना बुधवार तालीमचे अध्यक्ष रणजित शिंदे, सुनील शिंदे, इब्राहिम मुल्ला, राकेश पाटील, हेमंत साळोखे, प्रथमेश ठोंबरे, सौरभ ठोंबरे, अखिलेश भोसले, अजित पाटील, अरूण सावंत, उमेश मुळे, वर्षा मुळे, रमजान मकानदार, सरफराज मकानदार, हसन मकानदार आदी उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!