*’शाहूं’चे कागल शैक्षणिकदृष्ट्या राज्यात अग्रेसर बनविणार-राजे समरजितसिंह घाटगे*
*शाळांमध्ये मुलभूत सुविधांसह सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार*
बिद्री प्रतिनिधी.
कोल्हापूर संस्थानमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी मोफत व सक्तीचा शिक्षणाचा कायदा केला.त्यांची जन्मभूमी असलेला कागल तालुका शैक्षणिकदृष्ट्या सोयी सुविधा कमी असतानाही मेहनती शिक्षकांमुळे जिल्ह्यात अग्रेसर आहे.शाळांमध्ये पुरेसे शिक्षक उपलब्ध करून देण्यासह शाळांना मुलभूत सोयी-सुविधा पुरवून शाहूंचे कागल शैक्षणिकदृष्ट्या राज्यात अग्रेसर बनवण्याचे ध्येय आहे. तसेच सुरक्षिततेसाठी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेही बसवू.असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे उमेदवार राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
सोनाळी ता.कागल येथे त्यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
घाटगे पुढे म्हणाले,कागल गडहिंग्लज-उत्तुर मतदारसंघात अनेक गावांमध्ये प्राथमिक शाळांच्या इमारती गळक्या आहेत.मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे नाहीत.ई लर्निंगची सुविधा नाही.पुरेसे शिक्षकही उपलब्ध नाहीत.काही गावांमध्ये तर अंगणवाडीच्या चिमुकल्यांना देवळांचा आधार घ्यावा लागतो.हे दुर्दैवी आहे.पालकमंत्री विकास कामांसाठी सात हजार कोटी रुपयांचा निधी आणला म्हणतात. मग शाळांची अशी दुरावस्था का आहे?आम्ही कोणतेही संविधानिक पद नसताना 130 हून अधिक शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधा उपलब्ध करून दिली.अनेक गावांमध्ये शाळा खोल्या बांधकाम, दुरुस्ती,स्वच्छतागृह,संरक्षक भिंत अशा मूलभूत बाबींसाठी निधी दिला. आमदारकीची एक संधी द्या शैक्षणिक दृष्ट्या जिल्ह्यात अग्रेसर असलेले छत्रपती शाहू महाराजांचे कागल राज्यात आदर्श बनवून दाखवितो.
यावेळी शिवानंद माळी,संभाजीराव भोकरे, संदीप रोटे,सागर कोंडेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास बिद्रीचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील,राष्ट्रीय काँग्रेसचे सुरेशराव कुराडे,बाळासो तापेकर,अभिजीत तापेकर, प्रताप पाटील,शिवाजीराव कांबळे,सुवर्णा भोसले,रेखा खोळांबे,अनिता कांबळे,संजय कांबळे,राजू जाधव आदी उपस्थित होते.
छायाचित्र- सोनाळी ता.कागल येथे जाहीर प्रचार सभेत बोलताना महाविकास आघाडीचे उमेदवार राजे समरजिसिंह घाटगे,समोर मोठ्या संख्येने उपस्थित जनसमुदाय.
चौकट
शाहूंचा शैक्षणिक वारसा समरजितराजेंनी कृतीतून चालवला
यावेळी प्रविण खोळांबे म्हणाले, स्व. विक्रमसिंहराजे घाटगे यांनी ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे.यासाठी शिक्षण संकुलची स्थापना केली.समरजीतराजेंनी त्यामध्ये भर घालताना राजे अकॅडमी,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र,शिष्यवृत्ती सराव परिक्षा,चित्रकला स्पर्धा,आदर्श शिक्षक पुरस्कार,टॉक विथ राजे,विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती व साहित्य वाटप अशा विविध उपक्रमातून शाहूंचा शैक्षणिक वारसा कृतीतून चालवला आहे.चांगल्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांना आमदारकीची संधी देऊया.