Spread the news

” *शाहू साखर ” देशात पुन्हा अव्वल….*

देश पातळीवरील *”अतिउत्कृष्ट”* साखर कारखाना पुरस्कार जाहिर

*७० व्या पुरस्काराने शाहूच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा*

कागल,प्रतिनिधी.

कागल येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास नवी दिल्लीस्थित राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ या शिखर संस्थेमार्फत गळीत हंगाम २०२२-२०२३ साठीचा ‘ *अति उत्कृष्ट साखर कारखाना’* हा देश पातळीवरील पुरस्कार जाहीर झाला.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व व्यस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली.
पारितोषिक वितरण नवी दिल्ली येथे ऑगस्ट महिन्यात विशेष निमंत्रित अतिथींच्या उपस्थितीत शानदार सोहळ्यात होणार आहे.

शाहू कारखान्यास मिळालेला हा *सत्तरावा* पुरस्कार आहे. मिळालेल्या या पुरस्कारामुळे शाहू साखर कारखान्याच्या सभासद ,शेतकरी, अधिकारी,कर्मचारी,व हितचिंतकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

*चौकट-१*

*पुरस्कार शाहू महाराज,स्व.विक्रमसिंहजी घाटगे व सभासद शेतकऱ्यांना अर्पण*

*राजे समरजितसिंह घाटगे*

याबाबत प्रतिक्रिया देताना शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, कारखान्याला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या सर्वसामान्य माणूस आणि शेतकरी हिताच्या कृतीचा वारसा, कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी कारखाना चालवणेसाठी घालून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे ,तसेच कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांचे मार्गदर्शन ,सभासद , शेतकऱ्यांनी विश्‍वासाने व प्रामाणिकपणाने दिलेली साथ, व्यवस्थापनाचे नियोजनास अधिकारी-कर्मचारी यांच्या कष्टाची जोड, याचे फलित आहे. स्व राजसाहेब यांच्या पायवाटेने जाताना त्यांच्या पश्चात संचालक मंडळ, विश्वस्त म्हणून चोखपणे भूमिका पार पाडत आहे.लोक कल्याणकारी राजे छत्रपती शाहू महाराज यांना आदर्श मानून स्व. राजेसाहेब यांनी हा कारखाना चालवला. शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी व राजे साहेबांच्या अमृत महोत्सवी जयंती वर्षात कारखान्याचा झालेला हा गौरव म्हणजे प्रत्यक्ष कृतीतून त्यांना अभिवादन केले आहे.

**चौकट-2 **

*हा तर शाहूच्या सभासद-शेतकऱ्यांचा सन्मान*

*श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे*

यावेळी प्रतिक्रिया देताना शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे म्हणाल्या , कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी कारखान्याचे विश्वस्त म्हणून भुमिका बजावताना घालून दिलेली तत्त्वे व त्याला कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणाने दिलेली साथ तसेच व्यवस्थापनाचे नियोजनास , अधिकारी-कर्मचारी पुरवठादार यांच्या कष्टाची जोड यामुळे हे शक्य झाले आहे. कारखान्याचा राष्ट्रीय पातळीवर झालेला हा सन्मान आम्हाला विश्वासाने साथ देणाऱ्या शाहूच्या सभासद-शेतकऱ्यांचा सन्मान आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!