जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती

Spread the news

जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार

  1. युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती

करवीर तालुक्यातील सडोली खालसा जिल्हा परिषद मतदारसंघात प्रचार दौरा प्रसंगी शाहू महाराजांना विजयी करण्याचे आवाहन

कोल्हापूर :

इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार शाहू महाराज हे शककर्ते शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराजांच्या आचार – विचार घेऊन कार्य करत आहेत. स्वयंपाक करताना आपण भाजी निवडतानाही काळजी घेतो. मग जिल्ह्याची , राज्याची व देशाची धुरा असणार आहे ते खासदार निवडताना किती खबरदारी घ्यावी याचा विचार करायला हवा. त्यामुळे जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज हेच सक्षम उमदेवार आहेत, त्यांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी केले.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे
इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांचा करवीर तालुक्यातील सडोली
खालसा जिल्हा परिषदेतील हसूर दुमाला, भाटणवाडी, सोनाळी, पाटेकरवाडी, म्हालसवडे, कांचनवाडी गावच्या प्रचार दौऱ्याप्रसंगी ग्रामस्थांशी संवाद साधताना बोलत होत्या. यावेळी तेजस्विनी राहूल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती पुढे म्हणाल्या, शाहू महाराज यांनी समतेच्या विचार कायम ठेवून पुरोगामीत्व कायम राखले आहे. योग्य वेळ आली की आपली भूमिका मांडण्यात कधीच मागे राहिले नाहीत. त्यांच्या अभ्यास व अनुभवाचा निश्चित फायदा होणार आहे. संभाजीराजे छत्रपती असताना अनेक विकासकांमासाठी गावागावात निधी दिला. शहरातील अनेक महत्वाचे विषय मार्गी लावण्यात प्रभावी काम केले आहे.

दिल्लीत सर्वात प्रथम शिवजयंती साजरी करण्याचे कार्य संभाजीराजे व कोल्हापूरांचे आहे. रायगडावरून शिवराज्याभिषेक सोहळ्यातून शिव- शाहुंचे विचार रुजविण्याचे कार्य सुरु आहे. आपण सर्व जण या सोहळ्यात सहभागी व्हावा असे आवाहनही केले.

दौऱ्याप्रसंगी सरपंच सरिता सरदार पाटील, भोगावतीचे संचालक सुनील खराडे, उपसरपंच बाबुराव पाटील, वैशाली खराडे, इंदुमती कासार, इंदुमती पाटील, सुनीता कुंभार, तुकाराम खराडे, धनंजय पाटील, शंकरराव पाटील आदी ( हसूर दुमाला), गीतांजली पाटील, जयश्री परीट, मनीषा पाटील, मछिंद्र पाटील, भीमराव कांबळे, केरबा पाटील(भाटणवाडी) सुरेश पाटील, माजी सरपंच मोहन पाटील, सरपंच विजया पाटील, बाळाबाई पाटील, उपसरपंच सिरमा पाटील, कृष्णात पाटील, प्रकाश पाटील, बळवंत गुजर ( सोनाळी ), सरपंच सुनीता पाटील, उपसरपंच सचिन पाटील, भगवान पाटील, विष्णुपंत पाटील, पोलीस पाटील नीता पाटील, विष्णु नागोजी पाटील, वसंत पाटील, कृष्णात पाटील, सविता पाटील ( पाटेकरवाडी), उपसरपंच सविता जयवंत पाटील, शंकर दादू पाटील, नामदेव गोपाळ पाटील, पंढरीनाथ सरनाईक, लक्ष्मण गोपाळ पाटील, सदाशिव पाटील, एकनाथ वरुटे, वसंत रामजी पाटील (म्हालसवडे ), सरपंच दीपाली सर्जेराव पाटील, युवा उद्योजक सर्जेराव पाटील, माजी उपसभापती विजय भोसले, बोन्द्रेदादा बँकेचे व्हा चेअरमन गणपती पाटील, दिनकर भोसले, डी बी भोसले, उपसरपंच कुंडलिक दळवी, विलास भोसले, विष्णुपंत भोसले ( कांचनवाडी) यांचेसह गावागावातील प्रमुख नेतेमंडळी, ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, सर्व ग्रामस्थ, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!