शाहू छत्रपतींना सर्वाधिक मताधिक्य देण्याचा बहुमान कसबा बावडा मिळवणार : आ. ऋतुराज पाटील
मालोजीराजे, आ. श्रीमती जयश्री जाधव, आ. ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली प्रचारफेरी; अभूतपूर्वत गर्दी अन् गगनभेदी जयजयकाराने परिसर शहारला
कोल्हापूर : कसबा बावड्यातील लक्ष्मी विलास पॅलेस ही राजर्षी शाहू महाराजांची जन्मभूमी आहे. त्यांनी बांधलेल्या राधानगरी धरणामुळे या भागातील शेती सुजलाम-सुफलाम झाली. छत्रपती राजाराम महाराजांनी शुगर मिलची उभारणी केल्याने कसबा बावड्याचे जीवनमान उंचावले. न्यू पॅलेसमुळे शाहू छत्रपती यांचे ऋणानुबंध बावडेकरांशी कायम राहिले आहेत. शाहू छत्रपतीवरील प्रेम व्यक्त करण्याची संधी लोकसभेच्या माध्यमातून मिळाली असून कसबा बावड्याचे मतदार सर्वाधिक मताधिक्य देण्याचा बहुमान बावडेकरच मिळतील, असा विश्वास आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला.
कसबा बावडा परिसरातील कवडे गल्ली ते हनुमान मंदिर आणि परिसरातील 20 पेक्षा अधिक गल्ल्या आणि विविध कॉलनी तसेच विविध वसाहतीमध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचारफेरी काढण्यात आली. त्यात दीड हजाराहून अधिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
प्रत्येक गल्लीबोळात शाहू छत्रपती, मालोजीराजे, आ. सतेज पाटील, आ. ऋतुराज पाटील आणि आ. श्रीमती जयश्री जाधव यांच्या जयजयकाराच्या कार्यकर्त्यांकडून अखंड घोषणा दिल्या जात होत्या. जागोजागी या नेत्यांचे नागरिकांकडून स्वागत तसेच महिला वर्गाकडून औक्षण केले जात होते. हलगी, घुमकीच्या ताल प्रचारफेरीत रंग भरत होता. काँग्रेस पक्षासह शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि बहुजन वंचित आघाडी या महाविकास आघाडीतील मित्रपक्षांच्या पदाधिकार्यांचा उत्स्फूर्त आणि एकजुटीने सहभाग या प्रचारफेरीचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले.
कवडे गल्ली, दत्त मंदिर परिसरातून सकाळी या भव्य प्रचारफेरीचा शुभारंभ झाला. धनगर गल्ली, चव्हाण गल्ली, ठोंबरे गल्ली, रणदिवे गल्ली, वेटाळे गल्ली, काग़लवाडी, उलपे गल्ली, चौगले गल्ली, वाडकर गल्ली, हनुमान गल्ली, आंबे गल्ली, बलभीम गल्ली, माळ गल्ली, पिंजार गल्ली, संकपाळनगर, आंबेडकर नगर, जयभवानी गल्ली, बिबट्या बोळ, दत्त मंदिर रस्ता, शिंदे गल्ली मार्गे हनुमान मंदिर परिसरात जवळपास तीन तासाहून अधिक काळ सुरू असलेल्या या प्रचार पदयात्रेचा समारोप झाला.
यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, आ. शाहू छत्रपतींच्या विजयासाठी आ. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली याबाबतचे सूक्ष्म नियोजन तयार असून 4 जून रोजी मतमोजणी वेळी कसबा बावडावासियांचा चमत्कार लोकांना दिसेल.
मालोजीराजे म्हणाले, या पदयात्रेत दिसलेला लोकांचा आणि घटक पक्षांचा उत्स्फूर्त सहभाग हा शाहू छत्रपतींचा लोकसभा निवडणुकीतील विजय किती विक्रमी असेल, याचे प्रत्यंतर आणून देणारा आहे.
या प्रचार पदयात्रेचे संयोजन माजी नगरसेवक मोहन सालपे, सुभाष बुचडे, डॉ. संदीप नेजदार, श्रावण फडतारे, अजित पोवार-धामोडकर, श्रीराम सोसायटीचे चेअरमन उमाजी उलपे, व्हाइस चेअरमन दत्तात्रय मासाळ, संचालक अनंत पाटील, रमेश रणदिवे, युवराज उलपे, सुभाष गरगडे, राजू चव्हाण, धनाजी गोडसे, हिंदूराव ठोंबरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जयवंत पाटील, सागर यवलुजे, संजय लाड, सुरेश उलपे, दिनकर उलपे, बहुजन वंचित आघाडीचे अविनाश कांबळे, शिवसेना ठाकरे गटाचे राहुल माळी, अक्षय खोत, उत्तम घोरपडे, नारायण गायकवाडे, विनायक घोरपडे, उमेश सावंत, गुरूदास ठोंबरे, उदय जाधव, विष्णू पोवार, बामसेफचे महेश बावडेकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रशांत पाटील, लक्ष्मण करपे, विनायक बोनगे, दयानंद गुरव, मंदार पाटील यांनी केले.