शाहू छत्रपती हे दिल्लीत
कोल्हापूरचा मानसन्मान वाढवतील
कृष्णराव किरुळकर
शाहू छत्रपतींच्या प्रचारासाठी राधानगरी तालुक्यातील सभांना मोठी गर्दी
राधानगरी: एकीकडे अनेकांना उमेदवारी मिळविण्यासाठी दिल्ली दरबारी तळ ठोकून बसावे लागत असून कोल्हापुरच्या शाहू छत्रपतींना मात्र महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींनी कोल्हापूर लोकसभेची उमेदवारी देऊन त्यांचा सन्मान केला आहे. त्यांनी न मागता त्यांना उमेदवारी दिली असून आता त्यांनी न मागता आपण लाखांनी मते देऊन त्यांचा अजून सन्मान करूया. आमचे सन्मानित राजे कोल्हापूरचाही दिल्ली दरबारी मानसन्मान वाढवतील असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष कृष्णराव किरूळकर यांनी केले.
श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या प्रचारासाठी राधानगरी तालुक्यातील शिरगाव येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती म्हणाले,”इंडिया आघाडी सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांसाठीची १८ टक्के जीएसटी रद्द करणार असून चुकीची अग्निवीर भरती पद्धत बदलण्याला प्राधान्य दिले जाईल. याशिवाय तरुणांच्या हाताला काम आणि शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम देण्यासाठी नवे सरकार सुधारित धोरण राबवेल.”
सरपंच संदीप पाटील यांनी स्वागत केले. बाजीराव चौगले यांनी प्रास्ताविक केले. माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदिगरे,शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा सुनील शिंत्रे यांची भाषणे झाली.
दरम्यान आजच्या प्रचार दौऱ्याची सुरुवात आमजाई व्हरवडे येथील प्रचार सभेने झाली. या सभेत बोलताना शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे म्हणाले,” कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजय होतील असे वातावरण आहे.
जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील म्हणाले,”शिक्षण विरोधी धोरण राबविणारे भाजपाचे सरकार हे सरकारी शाळा बंद पाडून खाजगीकरणाला प्राधान्य देत आहे.असल्या दंगलखोर, जातीवादी सरकारला हटविण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पुरोगामी विचारांचा वारसा असणाऱ्या श्रीमंत छत्रपती शाहूंना आपले सुसंस्कृत लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देऊया.”
दरम्यान, आजच्या प्रचार दौऱ्यात गुडाळ, तारळे खुर्द येथेही जाहीर सभा झाल्या. त्यांनाही गर्दी करीत कार्यकर्त्यांनी मोठा प्रतिसाद दिला.
या दौऱ्यात विविध ठिकाणी जिल्हा बँकेचे संचालक ए.वाय. पाटील, शिवसेना उपनेते संजय पवार, भोगावती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले, दयानंद कांबळे आदींची भाषणे झाली.
भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा शिवाजीराव पाटील, माजी अध्यक्ष संजयसिंह पाटील,उपाध्यक्ष राजाराम कवडे, माजी उपाध्यक्ष पी डी धुंदरे, विश्वनाथ पाटील, संचालक दत्तात्रय पाटील,रवींद्र पाटील,धीरज डोंगळे,मानसिंग पाटील,अभिजीत पाटील, गोकुळचे संचालक अभिजीत तायशेटे व आर के मोरे,सुशील पाटील- कौलवकर,बाजार समितीचे संचालक शिवाजीराव पाटील, माजी संचालक दिनकर बाळा पाटील,समाज कल्याण समितीचे माजी सभापती अण्णाप्पा कांबळे व साताप्पा कांबळे, सुप्रिया साळोखे, मधुकर वरुटे, सरपंच अमृता बाजीराव चौगले, माजी सरपंच मोहन पाटील,कृष्णात पाटील,बी के डोंगळे, नेताजी पाटील, सुनील चौगले, प्रभाकर पाटील बाळासाहेब वरुटे आदी उपस्थित होते.
………………
चौकट १
होय…. आम्ही सगळेच शाहू छत्रपतींचे प्रवक्ते !
विरोधी उमेदवार संजय मंडलिक यांनी सतेज पाटील हे शाहू छत्रपतींचे प्रवक्ते आहेत काय अशा केलेल्या सवालाला आज शिवसेनेचे विजय देवणे यांनी सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले, केवळ सतेज पाटीलच नव्हे तर महाविकास आघाडीचे आम्ही सर्व नेते आणि कार्यकर्तेही शाहू छत्रपतींचे प्रवक्ते आहोत.
…………
गद्दार आणि खुद्दार यातला फरक जनता मतदानातून दाखवून देईल
खासदार संजय मंडलिक यांच्यावर तोफ डागताना संजय पवार म्हणाले, या महाराष्ट्रात कुणी कुणाशी गद्दारी केली आणि खरोखर खुद्दार कोण आहेत हे सर्वसामान्य जनतेला माहीत असून गद्दारी आणि खुद्दारी मधला फरक ही जनता मतदानातून दाखवून देईल.
……….