स्वार्थी के.पी.पाटलांनी सर्व मोठी पदे घरात ठेवून कार्यकर्त्यांना वा-यावर सोडले-महायुतीचे उमेदवार आमदार प्रकाश आबीटकर
गारगोटी:
मुदाळची सरपंच सुन, मौनी विद्यापीठात मुलगा, शिवाजी विद्यापीठात पत्नी, गोकुळमध्ये कुलदिपक, जिल्हा बॅंकेत स्वतः आणि आता मुलगा, राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष मीच, बाजार समिती प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष मीच, बिद्री कारखान्याचा २२ वर्षे चेअरमन मीच, आमदारकी मलाच अशा पद्धतीने सर्व मोठी राजकीय पदे स्वत: आणि कुटूंबातच ठेवून कार्यकर्त्यांना वा-यावर सोडणा-या स्वार्थी के. पी. पाटीलांची जनताच सर्व पदे काढून घेऊन घरात बसवेल असा इशारा महायुतीचे उमेदवार प्रकाश आबीटकर यांनी कडगांव येथे पार पडलेल्या विराट सभेत बोलताना दिला. अध्यक्षस्थानी कोकण केसरी के.जी.नांदेकर होते.
पुढे बोलताना आमदार आबीटकर म्हणाले, समविचाराने राजकारण करणाऱ्यंची तालुक्यात मोठी खाण आहे. मात्र स्वार्थाने बरबटलेल्या माजी आमदार के.पी.पाटील यांनी सर्व मोठी पदे स्वत:आणि कूटुंबातच ठेवल्यामुळे माझ्यासह अनेकांनी वेगळी वाट धरली. त्यामुळे दहा वर्षे आमदार म्हणून कार्यरत होते. के. पी. पाटील व माझ्या दहा वर्षाच्या कालावधीची जनतेने तुलना करावी. के.पी. पाटील त्यांनी केलेल्या कामे सांगण्याच्या आवाहन केले होते अद्याप त्याचे उत्तर दिले नाही. त्यांनी पुढील पाच वर्षात काय करणार आहे ते सांगून मते मागणे अपेक्षित असताना ते वैयक्तिक टीका टिपणी मध्ये मश्गुल आहेत ही अत्यंत निंदनीय बाब आहे.
जन संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आवाज उठवलेल्या शिवडाव सोनवडे घाट, तांब्याचीवाडी सह धनगरवाड्यांवर वीज, करंबळी केटी वेअर, धामणी प्रकल्प, डेळे-चिवाळे, कारीवडे, वासनोली, वाकीघोलातील रस्ते यासारखे रखडलेले विविध प्रलंबित प्रश्न मार्गस्थ लावलेले आहेत. देशातील पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षणाचा विषय ठरेल अशा पध्दतीने रांगणा किल्याचा विकास साधायचा आहे. तर खेडगे-दोनवडे-नितवडे येथील धबधब्याचा विकास केला आहे. राधानगरी मतदार संघाची जनता विकासाला साथ देणारी आहे. कोणतेही विकासाचे व्हिजन नसलेल्या माजी आमदार के.पी.पाटील यांना जनता निवडणूकीत थारा देणार नाही.
यावेळी बोलताना भााजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील म्हणाले की, माजी आमदार के.पी.पाटील हे खोटे पसरविण्यात माहीर असून ते भाजपा सक्रिय नसल्याचे नाहीत ते हा फुटला, तो फुटला अशा वावड्या उठवत आहेत. पण मी त्यांना जाहीर पणे सांगू इच्छीतो की तुमची अशी कारस्थाने जनतेला चांगलीच ठाऊक असून आमदार आबिटकर यांचा विजय सुकर करत आहे.
यावेळी बोलताना बाबा नांदेकर म्हणाले की, माजी आमदार के.पी.पाटील हे विकास कामांवर न बोलता आमदार आबिटकर यांची नाहक बदनामी करत सुटले आहोत. त्यांनी त्यांच्या कार्यकाळत काय दिवे लावले आहेत हे आम्हाला माहित आहे. सर्वच पदे घरात ठेवून कार्यकर्त्यांवर वाऱ्यावर सोडल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा असंतोष खदखदतो. याउलट आमदार आबिटकर यांनी प्रमुख कार्यकर्त्यांना मनाची पदे देऊन त्यांचा सन्मान केला आहे. विकास कुठे आहे म्हणणारे के.पी.पाटील ज्या रस्त्यावर जातात ते रस्ते, ज्या मंदीरात बैठक घेतात ती मंदीरे, ज्या चौकात सभा घेतात ते चौक यासह बहुतांशी कामे त्यांना मोतीबिंदू झाल्यामुळे दिसत नाहीत अशी टिका केली.
यावेळी बोलताना बाजार समितीचे संचालक संदीप वरंडेकर म्हणाले, के.पी.पाटील हे आमदार आबिटकर यांचेवर खालच्या स्तरावर जाऊन ते टिका करत आहेत. ते त्यांना शोभनीय नाही. त्यांनी या मतदार संघासाठी काय केले आहे व काय करणार आहेत हे सांगून मते मागणे अपेक्षीत असताना मतदारांना भडकाऊ वक्तव्य करून वातावरण दुषीत करू पाहत आहेत. पण येथील स्वाभिमानी जनता त्यांना थारा देणार नाही.
यावेळी आनंदा ढोकरे, बजरंग देसाई आदींची भाषणे झाली. यावेळी गोकुळ संचालक नंदकुमार ढेंगे, कल्याणराव निकम, प्रविणसिंह सावंत, सुर्याजीराव देसाई, देवराज बारदेस्कर, पांडूरंग डेळेकर, हिंदूराव देसाई, विलास बेलेकर, अमित देसाई, विश्वास पाटील, मानसिंग पाटील, प्रशांत देसाई, संग्रामसिंह सावंत, अजित देसाई, ए.बी.जाधव, शहाजी देसाई, नारायण चव्हाण, दिगंबर पोतदार, संभाजी देसाई, सत्तार शेख, इस्माईल शेख, राजू देसाई, आनंदा पाटील, मनोहर धोंड, वसंत पाटील, पांडूरंग पाटील, बाबुभाई शेख, रमेश रायजादे, सुशांत ताम्हणेकर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट –
आ. आबीटकरांनी दिली कार्यकर्त्यांना मोठी संधी…
माजी आमदार के पी पाटील सर्वच पदे घरात ठेवून कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले पण या उलट आ. आबीटकर यांनी गोकुळमध्ये दोन संचालक, बाजार समिती संचालक, महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन सदस्य, राहुरी कृषी विद्यापीठ सदस्य, राज्यस्तरीय आत्मा समिती सदस्य, शेतकरी संघ प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष, मौनी विद्यापीठ सदस्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधना समिती सदस्य, बाजार समितीवर दोन अशासकीय सदस्य, संजय गांधी समितीची अध्यक्षपदे यासह विविध मानाची पदे देऊन कार्यकर्त्यांचा सन्मान केल्याचे सात्तापा पाटील यांनी सांगितले.
फोटो:कडगांव येथील विराट सभेत बोलताना महायुतीचे उमेदवार आमदार प्रकाश आबिटकर समोर उपस्थित जनसमुदाय.