गगनबावड्यातील स्वाभिमानी जनतेने दबाव झुगारून लोकशाही मार्गाने मतदान करून मला निवडून द्यावे-
गारिवडे येथील असळज जिल्हा परिषद मतदारसंघातील भव्य मेळाव्यात चंद्रदीप नरके यांचे आवाहन- मेळाव्याला प्रचंड गर्दी
धुंदवडे ।वार्ताहर
आमदार सतेज पाटील यांचे गगनबावडा तालुक्यात दबावाचे राजकारण सुरू असून या पुढील काळात गगनबावडा तालुक्यातील जननेते लोकशाही मार्गाने मतदान करावे आणि येत्या विधानसभा निवडणुकीत गगनबावडा तालुका स्वाभिमानी आहे हे आपल्याला निवडून देऊन जनतेने सिद्ध करावे असे आवाहन महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके यांनी केले गारिवडे (ता. गगनबावडा) येथे शिवसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या असळज जि.प. मतदारसंघातील शिवसेना व मित्रपक्षांच्या जाहीर सभा व मेळाव्यात नरके बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच संतोष पाटील होते.
माजी आमदार नरके म्हणाले की दिवंगत आमदार यशवंत एकनाथ पाटील यांच्या काळात गगनबावडा लोकशाही मार्गाने समृद्ध होता.एका नेत्याने जनतेला जखडून ठेवल्याने तालुक्याची वाटचाल जनतेला लोकशाहीत मत मांडायचा अधिकार नाही अशा पद्धतीने सुरू आहे.येथे चहापेक्षा किटली गरम झाली आहे.त्यांच्या कारखान्याच्या संचालकांना किंमत आहे काय ? असा सवाल करून आपण लोकशाही मार्गाने गगनबावडा तालुक्यातील १७०० सभासदांना कुंभी कासारी कारखान्याचे सभासदत्व दिले, तुम्ही तुमच्या डी.वाय. पाटील कारखान्यात ऊस उत्पादकांना चार-पाच हजार सभासद देण्याची हिंमत दाखवाल काय ? असा सवाल त्यांनी आमदार सतेज पाटील यांना केला. मी पन्हाळा तालुक्यातील जनतेवर कधीही दबाव टाकत नाही, तुम्ही मात्र गगनबावडा तालुक्यातील जनतेवर दबाव टाकू नका, त्यांना लोकशाही मार्गाने मतदान करू द्या असा घनाघात नरके यांनी केला.आपण दहा वर्षात केलेली विकासकामे,संपर्क, रस्त्यावरील संघर्षमय वाटचाल घेऊन तुमच्यासमोर येत आहे, आता जागरूकपणे मतदान करून आपल्याला निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष पी.जी.शिंदे म्हणाले की गेल्या पंधरा-वीस वर्षात एका नेत्याने तोडफोड करून राजकारण केले, तुम्हाला आम्हाला विस्कळीत केले. मात्र येत्या विधानसभा निवडणुकीत गगनबावडा तालुका कसा आहे हे तुम्हाला तालुक्याची जनता दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी सतेज पाटील यांना दिला. सर्वसामान्य माणसांच्या हाकेला ओ देणारा, वाडीवस्तीवर राहणाऱ्या सामान्य माणसाला आधार असणाऱ्या चंद्रदीप नरके यांना विधानसभेत विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले
महाराष्ट्र राज्य व्हीजेएनटी, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किटवे यांनी पी.जी.आणि विजयाचे गणित इजी अशी टिप्पणी करुन मूलभूत सुविधांचे जाळे निर्माण करणाऱ्या महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत विजयी करावे, धनगर समाज १०० टक्के चंद्रदीप नरके यांच्या पाठीशी उभा राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
माजी जि.प.सदस्य मेघाराणी जाधव यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी १५०० रुपये दिल्यानंतर महाराष्ट्रावर कर्ज झाले असे म्हणणारे विरोधक आता दरोडा टाकून बहिणींना ३००० रुपये देणार काय असा सवाल केला.महागाईचे खोटे मुद्दे मांडणाऱ्या विरोधकांना प्रचाराचा कोणताही मुद्दा नसल्याने ते टीका करीत आहेत,मात्र सुज्ञ नागरिक चंद्रदीप नरके यांना विजयी केल्याशिवाय राहणार नाही असे त्या म्हणाल्या.
प्रास्ताविक पांडुरंग पाटील यांनी केले. यावेळी भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष महेश देसाई,शिवसेनेचे जावेद अत्तर, कौशल्या पाटील, भाजपचे उत्तम बांदाळे, विठ्ठल शाहीर (तिसंगी),भाजपचे राहुल कांबळे,भाजपाचे गगनबावडा तालुका अध्यक्ष स्वप्निल शिंदे यांची भाषणे झाली. माजी सभापती एकनाथ शिंदे, लहू गुरव, कमल काटे,शिवसेना गगनबावडा तालुका अध्यक्ष तानाजी काटे, राजवीर नरके, आनंदा पाटील, विश्वनाथ पोतदार, दादू पाटील, धनाजी गुरव, के.बी.पाटील, राजाराम पाटील,भूविकास बँकेचे माजी संचालक गजानन चौधरी, आनंदराव लहू पाटील, गणपती पाटील, संभाजी कुंभार,सचिन धायगुडे (पालघर), तानाजी पडवळ,लहू सरनोबत, ए.बी.पाटील,दिलीप पाटील, प्रकाश पाटील यांच्यासह गगनबावडा तालुक्यातील अनेक संस्थांचे पदाधिकारी, शिवसेना भाजप व मित्र पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते व तालुक्यातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.