भारतीय खेल प्राधिकरण-साई यांचे खेलो इंडियातंर्गत राव’ज अकॅडमी मध्ये आयोजित निवड चाचणी
कोल्हापूर :: उदयोन्मुख खेळाडू निवडून त्यांच्यातील गुणवत्ता वाढीसाठी प्रशिक्षण.प्रोत्साहन या उद्देशातून भारतीय खेल प्राधिकरण-साई यांचे खेलो इंडियातंर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांतर्गत येथील राव’ज अकॅडमी मध्ये आयोजित निवड चाचणीसाठी राज्यभरातून सातशे हून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत.
क्रिडांगणावरील कौशल्याबरोबरीने क्षमता चाचणी खेळाडूंच्या उत्साही सहभागातून आज दिवसभर घेण्यात आली.ती उद्या मंगळवारपर्यंत चालणार आहे.तर बुधवारी खोखो खेळाडूंची चाचणी घेण्यात येणार आहे.
भारतीय खेल प्राधिकरण-साई कडून येथील राव’ज अकॅडमी मध्ये मिळालेल्या खेलो इंडिया सेंटरच्या माध्यमातून घेण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे उदघाटन दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी प्रा.प्रभाकर हेरवाडे यांच्या हस्ते झाले.अध्यक्षस्थानी शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी प्रा.संभाजी पाटील होते.
प्रारंभी या राव’ज अकॅडमीचे मॅनेजिंग डायरेक्टर आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक डॉ.रमेश भेंडिगिरी यांनी सर्व खेळाडू, संघटकांचे स्वागत करुन प्रास्ताविकात उपक्रमाविषयी सांगितले.साईच्या प्रतिनिधी प्रियांका आलम यांनी खेलो इंडियाच्या उदयोन्मुख खेळाडूतील गुणवत्ता शोध व प्रशिक्षणासाठी प्रोत्साहन उपक्रमाविषयी सांगून या निवडप्रक्रियेविषयीची माहिती खेलो इंडियाच्या वेबसाईटवर उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.९ ते १२,१३ते १५, आणि १६ ते १८ या तीन वयोगटातील मुला-मुलींची चाचणी घेण्यात येईल असे सांगितले.
यावेळी अकॅडमीची सेक्रेटरी आंतरराष्ट्रीय खेळाडू उमा भोसले-भेंडिगिरी, कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष अजित पाटील, कोषाध्यक्ष प्रा.आण्णासाहेब गावडे, के.एम.सी.कॉलेजचे प्राचार्य डॉ.बाबासाहेब उलपे, आदी उपस्थित होते.प्रा.चंद्रशेखर शहा यांनी आभार व्यक्त केले.
सहभागी खेळाडूंचे खेळातील कौशल्य,क्षमता चाचणी क्रीडाशिक्षकाकडून घेण्यात येऊन ती माहिती साई केंद्राकडे ऑनलाईन पाठविण्यात आली.त्यासाठी ओंकार पायगुडे,उमा भेंडिगिरी,प्रा.चंद्रशेखर शहा, सयाजी पाटील, प्रकाश मोहिते, शंकर पोवार,कुबेर पाटील, साक्षी भेंडिगिरी,संदिप लवटे, हेमंत खानविलकर,शरद तावदारे, संदिप जाधव,नवनाथ पूजारी , प्रकाश कळंत्रे, नामदेव गावडे,अभिजित पाटणे, संतोष कुंडले, कार्तिक बचाटे,महेश सुर्यवंशी, संभाजी गावडे आदिनी काम पाहिले.