विमानतळ सल्लागार समितीवर तेज घाटगे यांची निवड

Spread the news

 

विमानतळ सल्लागार समितीवर तेज घाटगे यांची निवड

 

कोल्हापूर

खासदार शाहू छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर विमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी उद्योजक व माई ह्युंदाईचेद मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विमानतळ सल्लागार समितीपदासाठी घाटगे यांच्या नावाची शिफारस खासदार शाहू महाराज यांनी केली.

तेज घाटगे हे विविध संस्था, संघटनांशी निगडीत आहेत. उद्योग- व्यवसाय, दळणवळण, पायाभूत सुविधा, पर्यटन अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. सामाजिक उपक्रमात पुढाकार असतो. उद्योजक तेज घाटगे यांनी खासदार शाहू महाराज यांची भेट घेऊन आभार मानले. शाहू महाराज यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. या निवडीबद्दल सर्व क्षेत्रातून घाटगे यांचे अभिनंदन होत आहे. कोल्हापुरातून अनेक मोठ्या शहराशी विमान सेवा कनेक्ट व्हावी यासाठी प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया घाटगे यांनी दिली.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!