- “सत्यजित (नाना) कदम यांची शिवसेना कोल्हापूर जिल्हा समन्वयक (ग्रामीण-शहरी) पदी निवड”
कोल्हापूरः शिवसेनेचे मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. नाम. एकनाथजी शिंदे यांनी शिवसेना कोल्हापूर जिल्हा समन्वयक (ग्रामीण-शहरी) म्हणून सत्यजित (नाना) शिवाजीराव कदम यांची निवड केली आहे.
सत्यजित (नाना) कदम यांच्या प्रवेशानंतर शिवसेनेला कोल्हापूर शहरात मोठी ताकद मिळाली आहे. त्यांची कार्यशैली व संघटन कौशल्य लक्षात घेत उप मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी त्यांना पक्षाची मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांच्या निवडीमुळे शिवसेनेला जिल्ह्यात अधिक प्रभावीपणे कार्य करण्याची संधी मिळणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांसाठी शिवसेना भवन उभारण्याची जबाबदारी मा. एकनाथ शिंदे यांनी सत्यजित कदम यांच्यावर सोपवली आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधान सभा निवडणूकांमध्ये, सत्यजित (नाना) कदम यांनी प्रभावीपणे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात महायुतीला मोठे मताधिक्य मिळवण्यात मोलाचा वाटा उचलला होता. कोल्हापूर जिल्ह्यात शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे, आणि आगामी काळात शिवसेनेच्या उददिष्टांच्या पूर्ततेसाठी ते एकजूट होऊन काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.