Spread the news

सतेज पाटील यांच्याकडून पूरग्रस्तांची दिशाभूल

– सत्यजित कदम यांची टीका

कोल्हापूर

केवळ स्टंटबाजी करण्यासाठी काहीतरी केल्याचा आव सतेज पाटील आणत आहेत असा आरोप माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी एका पत्रकाव्दारे केला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारांची दिशाभूल करण्याचा सतेज पाटील यांचा केविलवाणा प्रयत्न आहे, पण मतदार आता शहाणे झाले आहेत अशी टीकाही कदम यांनी केली. आहे.

कदम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जिल्ह्याला महापुराने विळखा घातला असला तरी महापुराचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेती बाधित झाली आहे. तसेच अनेकांच्या घरात महापुराचे पाणी शिरल्याने प्रापंचिक साहित्य आणि इतर संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे. शासकीय नोंदीनुसार 30,284 हेक्टर शेती क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ऊस, भात, ज्वारी,सोयाबीन, भुईमूग, कडधान्ये अशा विविध खरीप पिकांचा समावेश आहे. शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने सध्या नजर अंदाज पंचनामे सुरू आहेत. महापुराचे पाणी पूर्णपणे ओसरल्यानंतर पीक नुकसानीचे प्रत्यक्ष पंचनामे केले जाणार आहेत.

जिल्ह्यात दोन हजाराहून अधिक सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तांची हानी झाली आहे. याही नुकसानीची पाहणी प्राथमिक स्तरावर शासकीय यंत्रणे कडून करण्यात येत आहे. ही वस्तुस्थिती असताना सतेज पाटील यांनी मात्र नेहमीप्रमाणे यातही राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला आहे.

 

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!