सारस्वत विकास मंडळाचा वीस एप्रिल ला सुवर्ण महोत्सव सोहळा
कोल्हापूर
येथील सारस्वत विकास मंडळ या संस्थेचा सुवर्ण महोत्सव सोहळा येत्या रविवार दिनांक 20 एप्रिल रोजी कोल्हापुरात होणार आहे. सकाळी नऊ वाजता सायबर येथील आनंद भवन येथे हा सोहळा होणार आहे.
सारस्वत विकास मंडळाची स्थापना पन्नास वर्षांपूर्वी झाली. विकास मंडळाच्या वतीने अनेक उपक्रम राबवले जातात. या संस्थेला आता पन्नास वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने सुवर्ण महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री निशिगंधा वाड- देऊलकर व सुप्रसिद्ध सिने अभिनेते दीपक देऊलकर तसेच कीर्तने अँड पंडित चे मॅनेजिंग पार्टनर संदीप वेलिंग हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ऑल इंडिया सारस्वत कल्चरल ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष डॉ. अजित गुंजीकर हे भूषवणार आहेत.
या कार्यक्रमाचे नियोजन सिद्धार्थ लाटकर, सचिन जनवाडकर, मुकुंद कुलकर्णी, अमित सलगर, गिरीश घोलकर, हर्षांक हरळीकर हे करत आहेत.