संताजी घोरपडे यांनी दाखल केला करवीर मधून उमेदवारी अर्ज
ज्यांची सेवा केली तेच अर्ज भरायला सोबत
कोल्हापूर :
महापूर आणि कोरोना काळात केलेल्या प्रचंड समाजसेवेच्या जोरावर अशाच अनेक व्यक्तींना सोबत घेत करवीर मतदार संघातून जनसुराज्य पक्षाच्या वतीने संताजी घोरपडे यांनी आपला अर्ज दाखल केला आपली उमेदवारी निवडून येण्यासाठीच असल्याचे त्यांनी यावेळी पुन्हा एकदा स्पष्ट केले करवीरची जनता माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला समाजाची सेवा करणाऱ्या व्यक्तीला यावेळी निश्चित संधी देणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी जनसुराज्यचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहीलेल्या करवीर मतदारसंघातून जनसुराज्य शक्ती पक्षाच्यावतीने संताजी घोरपडे यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. जनसुराज्यचे आमदार डॉ. विनय कोरे यांच्या प्रमुख उपस्थित अर्ज दाखल केल्याने महायुतीतील घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य पक्षाच्यावतीने करवीर मतदारसंघात चुरस वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व शिवसेना शिंदे गट मिळून महायुती आहे. यात जिल्ह्यातील जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार डॉ.
विनय कोरे यांचा समावेश आहे. येथे मैत्रीपूर्ण लढत होणार असून संताजी घोरपडे हे जनसुराज्य पक्षाच्यावतीने मैदानात उतरले आहेत गेले तीन वर्षे या मतदारसंघात त्यांनी भरीव कामगिरी केलेले आहेत करवीर महोत्सव आणि विविध उपक्रम कोरोना आणि महापूर काळात केलेल्या कामाच्या जोरावर त्यांची उमेदवारी आता भक्कम झाली आहे मतदारसंघात तीन ते चार वेळा त्यांच्या पदयात्रा आणि घरोघरी संपर्क झाला आहे यामुळे या निवडणुकीत आपला विजय निश्चित असल्याचा त्यांनी दावा केला आहे.
करवीर मतदारसंघातून शुक्रवारी रमणमळा येथील निवडाणूक कार्यालयात घोरपडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. ज्यांची अनेक वर्षे सोबत सेवा केली तेच घोरपडे यांचा अर्ज भरायला उपस्थित होते अर्ज भरताना अनेकांना गहिवरून आले कारण त्यांनी घोरपडे यांची गेल्या तीन अनेक वर्षातील समाजसेवेची धडपड पाहिलेली आहे.
दरम्यान महायुतीकडे जनसुराज्य पक्षाने 15 जागा मागितले आहेत घटक पक्षांना सन्मानजनक वाटा देण्याची आपण मागणी केल्याचे विनय कोरे यांनी यावेळी सांगितले