संजीव राजाराम बोरकर यांचे निधन
कोल्हापूर
सारस्वत विकास मंडळ, कोल्हापूर चे ज्येष्ठ अभ्यासू व्यक्तिमत्व व मार्गदर्शक, माजी अध्यक्ष व विद्यमान उपाध्यक्ष तसेच सारस्वत बोर्डींग चे विद्यमान विश्वस्त संजीव (बाबा) बोरकर यांचे गुरुवारी दुःखद निधन झाले. निधना समयी ते 63 वर्षाचे होते.
सारस्वत विकास मंडळाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष चालू आहे, या ५० वर्षात संस्था मोठी करण्यात सिंहाचा वाटा उचलला.
कोल्हापूर जिल्हा न्यायालयातून वरीष्ठ लिपीक म्हणून निवृत्ती नंतर न्यायालयीन कामकाजाबाबतचे सल्लागार म्हणून खासगी क्षेत्रात कार्यरत होते.
पाठीमागे आई, एक भाऊ, दोन बहिणी, पत्नी व कन्या असा परिवार आहे.