शिवसेनेचा बाप व चिन्ह चोरणाऱ्या गद्दारांना करवीर मध्ये धडा शिकवा संजय पवार परिते येथे राहुल पाटील यांच्या प्रचार सभा

Spread the news

शिवसेनेचा बाप व चिन्ह चोरणाऱ्या गद्दारांना करवीर मध्ये धडा शिकवा
संजय पवार
परिते येथे राहुल पाटील यांच्या प्रचार सभा
परिते
माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी शिवसेनेची कधीही एखादी शाखा काढली नाही अथवा लोगो वापरला नाही . केवळ स्वार्थासाठी शिवसेनेचा वापर केला असून त्यांच्यात हिंम्मत असेल तर स्वतःच्या जीवावर निवडणूक लढवावी करवीर मधील जातिवंत शिवसैनिक अशा गद्दारांना कधीच थारा देणार नसून शिवसेनेचा बाप व चिन्ह चोरणाऱ्या आणि मातोश्रीच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या गद्दारांना धडा शिकवा अशी घणाघाती टीका शिवसेनेचे उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केली .
परिते ता करवीर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पी पाटील सडोलीकर यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते सभेचे अध्यक्षस्थानी यशवंत चंद्राप्पा पाटील हे होते . आपल्या भाषणात पुढे बोलताना पवार यांनी स्वर्गिय आमदार पी एन पाटील यांचा व आमचा खरा संपर्क लोकसभा निवडणूकीत आला ते खऱ्या अर्थाने जनतेशी व पक्षाशी एकनिष्ठ होते . करवीरच्या विकासाचे खरे नायक तेच आहेत मात्र दलबदलू नरके यांनी सत्तेसाठी मातोश्री व उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून निष्ठावंत शिवसैनिकांचा विश्वासघात केला आहे या गद्दारांना पराभूत करून निष्ठावंत शिवसैनिक सर्व हिशोब चुकते करील असे सांगितले .
यावेळी बोलताना उमेदवार राहुल पाटील सडोलीकर यांनी स्वर्गिय पी एन पाटील यांनी शेतकरी कर्जमाफी प्रोत्साहन पर अनुदानाचा प्रश्न सोडवून शेतकऱ्यांना न्याय दिला धामणी प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लावला तसेच काळम्मावाडी धरण गळती साठी भरीव निधी उपलब्ध केला आहे . शेतकऱ्याच्या कर्जमाफी सह प्रामाणिक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान मिळवून देण्यासाठी सर्वस्व पणाला लावले होते .त्यांचे विकासाचे अपुरे कार्य पुर्ण करण्यासाठी आशिर्वाद द्या असे आवाहन केले .
यावेळी बोलताना भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशिल पाटील कौलवकर यांनी करवीरच्या विकासासाठी पी एन पाटील हे खऱ्या अर्थाने सर्वसामान्याचे आधारवड होते . त्यांनी मतदार संघाच्या विकासासाठी आपले जिवन वेचले होते राहुल पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करणे हीच पी एन पाटील यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे सांगितले .
बाबासाहेब देवकर व प्रा टी एल पाटील यांनी धामणीचे खरे शिल्पकार पी एन पाटील हेच असून खोटे श्रेय लाटणाऱ्या विरोधकांना पराभुत करा असे सांगितले .यावेळी सरपंच मनोज पाटील, यशवंत पाटील यांची भाषणे झाली . यावेळी भोगावती कारखान्याचे अध्यक्ष प्रा शिवाजीराव पाटील संचालक धोंडीराम पाटील अक्षय पवार पाटील केरबा भाऊ पाटील शिवाजी कारंडे शे का पक्षाचे नेते क्रांतिसिंह पवार पाटील बाबासाहेब देवकर शिवसेनेचे नेते बाजीराव पाटील
तानाजी आंग्रे भरत आमते गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे मल्हार सेनेचे अध्यक्ष बबन रानगे बुद्धीराज पाटील विश्वास मुसळे निवृत्ती मुसळे उपसरपंच शारदा विलास पाटील यांच्या सह भोगावती साखर कारखान्याचे आजी माजी संचालक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
फोटो कॅप्शन
परिते ता करवीर येथेमहाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पी पाटील यांच्या जाहीर सभेत बोलताना शिवसेनेचे उपनेते संजय पवार व्यासपीठावर राहुल पाटील क्रांतीसिंह पवार पाटील बाजीराव पाटील तानाजी आग्रे व मान्यवर


Spread the news

You may also like

error: Content is protected !!