संजय मंडलिकांचा विजय मोदीजींच्या बलशाली भारतासाठी आवश्यक ; खासदार मिलिंद देवरा.
महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ उद्योजक संमेलन.
कोल्हापूर ता.२०:
विकसित व बलशाली भारत घडविण्यासाठी शाश्वत विकासाचे धोरण घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्य करत आहेत.त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना प्रचंड मतांनी विजय करा.” असे आवाहन खासदार मिलिंद देवरा यांनी केले.
माहितीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांसाठी कोल्हापूर येथे, आयोजित उद्योजक संमेलनात ते बोलत होते.
खासदार देवरा म्हणाले ,” मोदीजींच्या पंतप्रधानपदाच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात रस्ते, रेल्वे, विमानसेवा या सेवांचा विकास झाल्यामुळे दळणवळणाच्या सुविधा सहज उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे व्यापार, वाणिज्य, व्यवसाय, गुंतवणूक यांसारख्या गोष्टींना विस्तार करण्याची संधी मिळत आहे. ‘स्टार्ट अप इंडिया’च्या माध्यमातून देशात रोजगार निर्मितीला चालना मिळवून दिली आहे. कोल्हापूरला नवीन विमान टर्मिनलची उभारणी करण्यासाठी मुबलक निधी मोदी सरकारने दिला. देशाच्या विकासासाठी, औद्योगिक उन्नतीसाठी, उज्वल भविष्यासाठी आणि देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी तिसऱ्यांदा मोदीच पंतप्रधान हवेत.यासाठी महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा.” असे आवाहन देवरा यांनी यावेळी केले.
महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक म्हणाले ,” छत्रपती राजर्षि शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या औद्योगिकीकरणाचा पाया घातला. त्यानंतर म्हादबा मिस्त्रीपासून बापू जाधवांपर्यंत अनेक भूमिपुत्रांसह देशातल्या अनेक उद्योजकांनी कोल्हापूरला उद्योगनगरी बनवले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हयाच्या औद्योगिक विकासासाठी विमानतळाचे सक्षमीकरण, रेल्वेचे आधुनिकीकरण , राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरण , राज्य मार्गांचे चौपदरीकरण केले. भविष्यातील
उद्योग वाढीसाठी आयटी क्षेत्राचा विकास , महालक्ष्मी यात्रा स्थळासाठी ६०० कोटी रुपये चा निधी , हायकोर्टाचे खंडपीठ यासह शेतजमीन वाचवून दळणवळण वाढवण्यासाठी प्रयत्नशील असेन. त्यासाठी जो जनतेचा जाहीरनामा तोच आमचा जाहीरनामा असेल.”
खासदार धनंजय महाडिक म्हणाले,”पंतप्रधान नरेंद्र मोदीनी जनहिताच्या कल्याणकारी योजना राबविल्याने पुन्हा मोदी सरकार येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या औद्योगिकरणाच्या बळकटीसाठी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठा निधी कोल्हापूर जिल्ह्याला मिळाला. देश कोणाकडे सुरक्षित राहील ,आपल्या मुलाबाळांचे भवितव्य कोण घडवणार,देशाचा आर्थिक स्थर कोण उंचावेल यासाठीचा निर्णय घेण्यासाठी ही निवडणूक आहे.
सत्यजित कदम, श्रीकांत पोतनीस यांच्यासह मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे हरिश्चंद्र धोत्रे , गोशिमाचे अध्यक्ष राजू दलवाई ,स्वरूप कदम, क्रीडाई चे के. पी. खोत , इंजीनियरिंग असोसिएशनचे अजय कोराने , चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रदीपभाई कापडिया, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश केसरकर , स्मॅक शिरोलीचे सुरेंद्र जैन , राजू पाटील यांच्यासह विविध औद्योगिक क्षेत्रातील नामवंत उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.