संजय घोडावत यांचा २८ फेब्रुवारी रोजी वाढदिवस” विविध कार्यक्रमाचे आयोजन ‘बॉलीवूड फिल्म स्टार आयुष्यमान खुराना यांची प्रमुख उपस्थिती’

Spread the news

कोल्हापूर : संजय घोडावत विद्यापीठाचे, चेअरमन, उद्योजक संजय घोडावत यांचा ६० वा वाढदिवस २८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता घोडावत विद्यापीठाच्या प्रांगणात विविध कला, गुणदर्शनाने साजरा करण्यात येणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर,उद्योजक, अधिकारी उपस्थित राहणार असून याप्रसंगी बॉलीवूड फिल्म स्टार, गायक ‘आयुष्यमान खुराना’ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती विश्वस्त विनायक भोसले यांनी दिली आहे.

याप्रसंगी विद्यापीठाचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘उमंग’ कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते होणार आहे. यामध्ये संगीत, नृत्य, फॅशन शो,गायन,नाटक याद्वारे विद्यार्थी आपले कलागुण सादर करणार आहेत. त्याचबरोबर कला, क्रीडा,संस्कृती,साहित्य, शिक्षण, उद्योग क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या नेतृत्वाला ‘एसजीयु आयकॉन २०२५’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

विद्यापीठ स्तरावर या वार्षिक स्नेहसंमेलनाची आणि वाढदिवसाची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती आयोजक कमिटीने प्रसारमाध्यमास दिली आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!