कोल्हापूर: संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट-टर्म कोर्सेस “ऍडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी” अंतर्गत उद्योग सुरक्षा आणि आरोग्य या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून संचालक, देविदास गोरे ग्लोबल कम्युनिटी केअर इन्स्पायर सेफ्टी फाउंडेशन, मुंबई हे होते. यावेळी संजय घोडावत इइन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी, डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट-टर्म कोर्सेस विभागाचे विभाग प्रमुख, प्रा. अजय बी. कोंगे, कॉम्प्युटर विभागाचे विभाग प्रमुख, प्रा. सागर चव्हाण, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन विभाग प्रमुख, प्राध्यापिका रईसा मुल्ला, इलेक्ट्रिकल विभागाचे विभाग प्रमुख प्रा. नितीन पाटील, मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख प्रा. योगेश पोवार सर्व प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इन्स्टिट्यूटचे संचालक, डॉ. विराट गिरी यांनी उद्योग सुरक्षा अनुरोग्य या कार्यक्रमाचे आयोजनाचे उद्देश आणि महत्त्व सांगून प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल स्वागत केले. संचालक देविदास गोरे यांनी उद्योग सुरक्षा पद्धती आरोग्य मानके आणि विविध उद्योगांमध्ये सुरक्षित कार्य करण्याच्या पद्धती नियमावली सुरक्षित वातावरण व त्याचे महत्त्व सांगून इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना जीवनात सुरक्षा आणि आरोग्याची घ्यावयाची काळजी त्यावर उपाययोजना याविषयी मार्गदर्शन केले.
विभाग प्रमुख प्रा. अजय कोंगे यांनी संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये सुरू असलेला महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मान्यताप्राप्त “ऍडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी” या कोर्सची
प्रवेश प्रक्रिया, कोर्सला प्रवेश घेण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, कोर्समध्ये असणाऱ्या विविध अभ्यासक्रमाचे नियोजन, कोर्सेसची उपयुक्तता याविषयी माहिती देऊन मार्गदर्शन कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणित भोसले यांनी केले.
संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन, संजयजी घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांच्या मार्गदर्शना खाली उद्योग सुरक्षा आणि आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.