संजय घोडावत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा मान्यवरांना ‘एस.जी.यू आयकॉन’ प्रदान

Spread the news

संजय घोडावत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

  1. U­

 


मान्यवरांना ‘एस.जी.यू आयकॉन’ प्रदान

  •  

अतिग्रे: उद्योगपती संजय घोडावत यांचा ६० वा वाढदिवस घोडावत विद्यापीठात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे, क्रीडापटू स्वप्निल कुसाळे, ईएनटी सर्जन, डॉ. अशोक पुरोहित, शिक्षण तज्ञ डॉ. अनिल पाटील व महाबळ ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज यांना ‘एस.जी.यू आयकॉन’ प्रदान करण्यात आले. याप्रसंगी बॉलीवूड अभिनेता अंशुमन खुराना उपस्थित होते.

तसेच संजय घोडावत यांच्या पत्नी नीता घोडावत, श्रेणिक घोडावत, सलोनी घोडावत, श्रेया घोडावत, विजयचंदजी, जयचंदजी, राजेशजी, व राकेशजी घोडावत, आणि कुटुंबीय उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला घोडावत विद्यापीठाच्या ‘उमंग’ या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर संजय घोडावत ग्लोबल एज्युकेशन कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यावेळी एम.डी श्रेणिक घोडावत यांनी संजय घोडावत ग्रुपच्या उद्योगांची माहिती देऊन ‘2030 व्हिजन आणि मिशन’ बद्दलच्या भविष्यकालीन योजना सांगितल्या.

आयुष्यमान खुरानाने संजय घोडावत यांनी उद्योग क्षेत्रात आणि शिक्षण क्षेत्रात केलेल्या प्रगतीचे व योगदानाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

यावेळी संजय घोडावत यांच्या कर्तुत्वावर आधारित संजय आवटे यांनी संपादित केलेल्या ‘माझा अभिमान’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ‘एस. जी. यु आयकॉन’ पुरस्काराचे वाचन डॉ. विराट गिरी यांनी केले. सूत्रसंचालन सोहन तिवडे तर प्रा. डिसोजा यांनी आभार मानले. याप्रसंगी विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू प्रा. डॉ. उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे तसेच सामाजिक, राजकीय, आर्थिक व उद्योग क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.

*चौकट*
अभिनेता अंशुमन खुराणाच्या गायन नृत्याने उपस्थितांनी ठेका धरला. त्याने पानी दा, रंग देखवे हे गाणे गायले तसेच नृत्य देखील केले यावर सर्वांनी जल्लोष केला.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!