ईडीला घाबरून पळून जाणाऱ्या उमेदवाराला विजयी करायचे काय?हे कागलच्या सुज्ञ जनतेनेच ठरवावे* *संभाजीराव भोकरे यांचा सवाल*

Spread the news

*ईडीला घाबरून पळून जाणाऱ्या उमेदवाराला विजयी करायचे काय?हे कागलच्या सुज्ञ जनतेनेच ठरवावे*

*संभाजीराव भोकरे यांचा सवाल*

*बेलवळे खुर्दमधील कार्यकर्त्यांचा पवार गटात प्रवेश*

बाचणी ,प्रतिनिधी.

कागल गडहिंग्लज -उत्तूर विधानसभा मतदारसंघात एका बाजूला तरुणांच्या हाताला रोजगार, महिलांचा सन्मान,ज्येष्ठांना मान देणारे शाश्वत व पारदर्शी नेतृत्व, भ्रष्टाचारमुक्त कारभाराच्या विचाराचे छत्रपती शाहू जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे यांची उमेदवारी आहे. तर दुसऱ्या बाजूला केवळ कमिशनसाठी रस्ते-गटर्स कामामध्ये इंटरेस्ट असणारे,मर्जीतील चार कंत्राटदारांना पोसणारे,ईडीला घाबरून पळून जाणारे उमेदवार आहेत. त्यामुळे
ईडीला घाबरून पळून जाणाऱ्या उमेदवाराला विजयी करायचे का? हे आत्ता कागलच्या सुज्ञ जनतेनेच ठरवावे.असा सवाल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे यांनी केला.

बेलवळे बुद्रुक ता कागल येथे महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. माजी सरपंच शामराव पाटील अध्यक्षस्थानी होते

यावेळी बेलवळे खुर्दमधील उत्तम कांबळे,अशोक कांबळे,वैभव कांबळे आणि सतेज कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.
उमेदवार समरजीतसिंह घाटगे म्हणाले, गेल्या नऊ वर्षात गट तट न पाहता शाश्वत विकासाचे व्हिजन घेऊन कागल, गडहिंगलज उत्तुर् विधानसभा मतदारसंघात मी कार्यरत आहे.छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थान मधील रयत हे आपले कुटुंब म्हणून त्यांच्या उद्धारासाठी अविरतपणे कार्य केले त्यांच्या तुलनेत थोडेफार तरी काम आपल्या हातून व्हावे असे मला वाटते. जनक घराण्याचे वंशज म्हणून आपल्यावर ही जबाबदारी आहे.या विभागातील जनतेच्या सुख दुखात सहभागी होताना गेल्या नऊ वर्षात गटतट न पाहता शासनाच्या योजनेचे लाभ लोकांना दारात जाऊन देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणखी मोठ्या प्रमाणात असे लाभ घेण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीत आम्हाला मोठ्या मताधिक्याने विजयी करा.

यावेळी शिल्पा पाटील,विशाल पाटील,संजय पाटील,सुनिल जाधव,शिवानंद माळी,सागर कोंडेकर, श्रीशैल पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी गोकुळचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील,वसंतराव पाटील,शाहूचे संचालक संजय नरके,सागर कोंडेकर,उत्तम पाटील,दिलीप पाटील,अशोक पाटील,मारुती पाटील,दाजी कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

*चौकट*
*लाडकी बहीण योजना आणखी सक्षमपणे राबविणार*

संजय पाटील म्हणाले,या निवडणुकीत राज्यामध्ये सत्तांतर होणार आहे. महाविकास आघाडीची सत्ता येईल.विरोधक लाडकी बहीण योजना आमचे सरकार आल्यास बंद करतील असा अपप्रचार करत आहेत. या खोट्या प्रचाराला बळी पडू नका.उलट ही योजना आणखी सक्षमपणे राबवण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे.

छायाचित्र बेलवळे बुद्रुक ता.कागल येथे बोलताना संभाजी भोकरे.व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे


Spread the news

You may also like

error: Content is protected !!