शाहू छत्रपतींच्या प्रचारासाठी संभाजी राजे छत्रपतींचा राधानगरी तालुक्यात झंजावाती दौरा
गावागावांतून मोठा प्रतिसाद
कोल्हापूर :
कोल्हापूरचे रखडलेले प्रश्न सोडवायचे असतील दिल्ली दरबारी ते ताकतीने मांडायचे असतील आणि कोल्हापूरला विकासाचा नवा चेहरा द्यायचा असेल तर श्रीमंत शाहू महाराज यांना दिल्लीत पाठवणे आवश्यक आहे असे आवाहन माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी विविध गावात झालेल्या बैठकीत केले.
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महाआघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारासाठी दोन दिवस राधानगरी तालुक्याचा झंजावाती दौरा सुरू केला असून गावागावांतून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.
मंगळवारी घोटवडे गावापासून संपर्क दौऱ्याची सुरुवात झाली. दिवसभरात त्यांनी कौलव, बरगेवाडी, सिरसे, आमजाई व्हरवडे, आवळी बुद्रुक, आणाजे, खिंडी व्हरवडे,गुडाळ आदी गावांतील प्रमुख राजकीय नेतेमंडळी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीवर भर दिला. गावोगावी त्यांचे अनेक ठिकाणी सुवासिनींनी औक्षण करून स्वागत केले. जेथे जेथे पोहोचणे शक्य आहे तेथे तेथे त्यांनी व्यक्तिगत भेटींवरही भर देत लोकांची या निवडणुकीमधील भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला.
यावेळी त्यांच्या समवेत भोगावती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले, माजी संचालक ए.डी.पाटील,अभिजीत पाटील, महादेव कोथळकर,जयवंत कांबळे,गोकुळ दूध संघाचे संचालक अभिजीत तायशेटे व आर के मोरे,बी.के.डोंगळे, पांडुरंग भांदिगरे, सुशील पाटील- कौलवकर,शिवसेनेचे नेते सुरेश चौगले,श्रीपती हुजरे, सागर धुंदरे, बाबा पाटील, संजय कांबळे आदी उपस्थित होते.
दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांच्या दौऱ्याची सुरुवात कसबा तारळे येथे अश्वारूढ शिवछत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. आज दिवसभरात त्यांनी कसबा तारळेसह तारळे खुर्द, कुकुडवाडी, कुंभारवाडी, कंथेवाडी,कळंकवाडी, आवळी खुर्द, घुडेवाडी, तरसंबळे, शिरगाव, मुसळवाडी, राशिवडे खुर्द, पुंगाव आदी गावांना भेटी दिल्या. या दौऱ्यात त्यांनी गावोगावी प्रमुख राजकीय नेते मंडळींच्या घरी भेट दिली. शिवाय प्रमुख चौक, तिकटी येथे जमलेल्या कार्यकर्त्यांना त्यांनी शाहू छत्रपती महाराज यांच्या स्वभाववैशिष्ट्यांची माहिती देत मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले.
दौऱ्यात त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पांडुरंग भादिगरे, माजी महापौर मधुकर रामाणे,भोगावती साखर कारखान्याचे संचालक दत्तात्रय पाटील, रवींद्र पाटील, प्रा.ए.डी.चौगले, माजी अध्यक्ष संजयसिंह पाटील, माजी सदस्य दत्तात्रय पाटील,प्रकाश पाटील,मोहन डवरी,उत्तम पाटील,काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष सुप्रिया साळोखे, सुधाकर साळोखे,संतोष पाटील, गुरुनाथ पाटील, शौकत बक्षु, हसन नाईक,दयानंद कांबळे,संजय पोवार, प्रशांत कांबळे, बाबा पाटील आदींसह विविध राजकीय नेते मंडळी सहभागी होती.
…………..