समरजीतराजेंच्या विजयाचा गुलाल घेऊनच मातोश्रीवर जाऊया-संजय पवार* *समरजितसिंह घाटगेंनी शिवसेना पदाधिकाऱ्यांची घेतली भेट*

Spread the news

*समरजीतराजेंच्या विजयाचा गुलाल घेऊनच मातोश्रीवर जाऊया-संजय पवार*

*समरजितसिंह घाटगेंनी शिवसेना पदाधिकाऱ्यांची घेतली भेट*”

कोल्हापूर,प्रतिनिधी.

महाविकास आघाडीस कागलमध्ये समरजितसिंह घाटगे यांच्या रूपाने सुसंस्कृत, उच्चशिक्षित चांगला उमेदवार मिळाला आहे.त्यांच्या विजयासाठी एकसंघपणे जीवाचे रान करुया.त्यांच्या विजयाचा गुलाल मातोश्रीवर उद्धव ठाकरे साहेबांपर्यंत घेऊन जाऊन त्यांनी दिलेला शब्द पाळल्याचे दाखवूया. शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरेसाहेबांना फसविणा-या महायुतीच्या उमेदवारांना धडा शिकवण्यास सज्ज रहा.असे प्रतिपादन शिवसेनेचे(उबाठा)जिल्हाप्रमुख व उपनेते संजय पवार यांनी केले.

खासदार शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरदचंद्र पवार प्रवेश केल्यानंतर शिवसेनेचे(उबाठा)जिल्हाप्रमुख व उपनेते पवार यांच्या निवासस्थानी घाटगे यांनी कागल गडहिंग्लज उत्तूर विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील शिवसेना उबाठा पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी विधानसभा निवडणुकीतील रणनीती बाबत सुद्धा चर्चा झाली.

शहर प्रमुख सुनील मोदी म्हणाले,पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फसवून त्रास दिलेल्या गद्दारांना घरात बसविण्यासाठी कागलमधून समरजीतराजेंच्या विजयात शिवसैनिकांचा महत्त्वाचा वाटा उचलतील.
शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या विजयाची सुरुवात कागलमधील परिवर्तनाने करूया.त्यासाठी सर्वांनी एकसंघपणे लढूया. राष्ट्रवादी पक्षासह महाविकास आघाडीमधील प्रोटोकॉल पाळत सर्व कार्यकर्त्यांचा मान सन्मान राखून काम करु.

यावेळी सह संपर्कप्रमुख रियाजभाई शमनजी, जिल्हा प्रमुख सुनिल शिंत्रे,विजय देवणे,हर्षल सुर्वे,प्रतिज्ञा उत्तूरे,विशाल देवकुळे,मंजीत माने,स्मिता सावंत, कमलाकर जाधव,शशी बिडकर,शैलेश पुणेकर,राहुल माने,संभाजी भोकरे,शिवगोंडा पाटील,जयसिंग टिकले,मारुती पुरीबुवा, बाबुराव शेवाळे, दिनकर लगारे,नागेश हसबे, युवराज येजरे,समीर देसाई,दिग्विजय पाटील यांच्यासह सह पदाधिकारी उपस्थित होते.

छायाचित्र

कोल्हापूर येथे शिवसेना उबाठा पक्षाचे उपनेते संजय पवार यांच्या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांच्या भेटीवेळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे


Spread the news

You may also like

error: Content is protected !!