*कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील समरजीत घाटगे गटाच्या पुणेकरांचा मुश्रीफ गटात जाहीर प्रवेश*
*पाच वर्षापूर्वीच्या आश्वासनांची पूर्तता न केल्याचा आरोप*
*समरजीत घाटगेंच्या कारभाराला कंटाळून ५० अधिक प्रमुखांनी सोडला गट*
*नवीद मुश्रीफ यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत*
*मांजरी बुद्रुक ता. हवेली, जिल्हा. पुणे दि. २०:*
कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील मूळ रहिवासी व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेल्या पुणेकर नागरिकांनी पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ गटात प्रवेश केला. समरजीत घाटगे यांनी पाच वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याचा आरोप करीत त्यांच्या ढोंगीपणाला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेश केलेल्यांमध्ये ५० हून अधिक पुणेकर प्रमुखांचा सहभाग आहे.
यावेळी सचिन तांबेकर रा. मांगणूर, सर्जेराव साळुंखे रा. बोळावी, आशिष इंगळे रा. उत्तूर, गणपती खोत रा. वडरगे, सागर बारदेस्कर, रवींद्र बहिरशेठ रा. कागल, सागर तोरस्कर रा. मांगनूर, विकास सुतार रा. मांगणूर, शुभम वरपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला. गोकुळ दूध संघाचे संचालक नविद मुश्रीफ यांनी सर्वांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या सर्व प्रमुखांचे स्वागत करताना नवीद मुश्रीफ म्हणाले, नामदार हसन मसाहेब मुश्रीफ यांचे नेतृत्व हे जनतेने घडविलेले लोकनेतृत्व आहे. गेल्या ३५- ४० वर्षांच्या राजकीय, सामाजिक वाटचालीत जनतेच्या सर्वच प्रश्नांची त्यांना जाण असल्यामुळेच जनता खंबीरपणे त्यांच्या पाठीशी राहिली आहे. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेल्या सर्वांचा योग्य मानसन्मान राखू. आम्ही सर्वजण व्यक्तिगत आणि पक्ष म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.
सचिन तांबेकर म्हणाले, ज्यांच्यासाठी वीस वर्षे अहोरात्र परिश्रम केले त्यांनी पाच वर्षांपूर्वी दिलेला एकही शब्द पाळला नाही. त्यांच्या नादाला लागून वीस वर्षे गुलालाशिवाय काढली. परंतु; यापुढे आयुष्यातील एकही दिवस बिना गुलालाचा आम्हाला घालवायचा नाही. त्यामुळेच आम्ही नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहोत.
यावेळी नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश युवक उपाध्यक्ष दत्तात्रय घुले , संजय चौगुले- मळगे खुर्द, शिवराज पाटील- गडहिंग्लज, दीपक पाटील- कडगाव, दत्तात्रय पाटील- बाचणी, शिवाजीराव पाटील- गलगले, आनंदराव चौगुले- सोनाळी, प्रितम भगवान घुले- पुणे, प्रकाश जावळे, लोमेश गायकवाड, दिपक परदेशी, रविंद्रभाई शेठ, चेतन वाज्या, ऋषिकेश जमदाडे, विनोद पाटणकर, विकास पाटील- कुरूकली, मयुर आवळेकर- लिंगनूर कापशी आदी मान्यवर उपस्थित होते.
……………..
*पुणे: कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघातील मूळ रहिवासी असलेल्या व सध्या पुण्यात वास्तव्यात असलेल्या ५० हून अधिक पुणेकर नागरिकांनी समरजीत घाटगे यांच्या गटाला सोडचिठ्ठी देत नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या गटात प्रवेश केला. या सर्वांचे स्वागत गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते झाले.*
============