……. *यामुळेच गडहिंग्लजसह उत्तुर कडगाव विभाग शाश्वत विकासापासून वंचित :*
*समरजिसिंह घाटगे*
*पालकमंत्र्यांचा निधी वर्षानुवर्ष फक्त रस्ते आणि गटारीवर*
*वझरे व महागोंड येथील संपर्क दौऱ्यात व्यक्त केली खंत*
उत्तूर / प्रतिनिधी
स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांच्या निधनानंतर गडहिंग्लजसह उत्तुर-कडगाव परिसराचा कागल विधानसभा मतदारसंघात समावेश झाला.मात्र स्व.कुपेकर यांच्या पश्चात त्यांच्या आदेशाप्रमाणे या परिसरातील जनतेने गेल्या वीस वर्षांपासून या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी विद्यमान पालकमंत्र्यांना दिली.मात्र या परिसराच्या नेमक्या गरजा त्यांना ओळखता न आल्याने वर्षानुवर्ष आलेला निधी केवळ रस्ते आणि गटारीवर खर्च केला.त्यामुळे येथील जनता शाश्वत विकासापासून वंचित राहिली.अशी खंत महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केली.
महागोंड व वझरे (ता. आजरा ) येथे महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांच्या प्रचारार्थ आयोजित संपर्क दौऱ्यात ते बोलत होते.
यावेळी महागोंडच्या सरपंच सौ.जयश्री देसाई यांच्या हस्ते राजे समरजितसिंह घाटगे यांचा सत्कार करण्यात आला.
श्री. घाटगे पुढे म्हणाले गेली वीस वर्षे मुश्रीफ यांनी विविध मंत्रिपदे भोगली आहेत.विशेष म्हणजे ते या राज्याचे जलसंधारण मंत्री देखील होते.असे असताना देखील आंबेओहोळ सारखा उत्तूर परिसरातील शेतकऱ्यांना वरदान प्रकल्प बरीच वर्ष रखडला. हे दुर्दैवच म्हणावे लागेल. आंबेओहळ प्रकल्पासाठी आम्ही 227 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. त्यानंतर रखडलेला हा प्रकल्प पूर्ण होऊन धरणात पाणी साठविले जात आहे. ही समाधानाची बाब आहे.आम्हाला आमदारकीची संधी द्या, येथील आंबेओहोळ धरणाचे पाणी या परिसरातील डोंगर,वाड्या-वस्त्यांवर पोहोचविल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.
यावेळी जनार्दन निऊंगरे ,जयसिंग देसाई, अनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले
यावेळी बाळासो करडे,नेताजी पाटील, वसंत घुरे, परशुराम पाटील, संजय देसाई,शशीताई पाटील यांच्यासह ग्रामस्थ,महिला, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत प्रास्ताविक अनिल पाटील यांनी केले. बंडा पाटील यांनी आभार मानले.
चौकट
बहुजन समाजच राजेंना आमदार करणार-कय्युम बुड्डेखान
यावेळी कय्युम आयुब बुड्डेखान म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवारांशी गद्दारी करणाऱ्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना बहूजन समाज मतदान करणार नाही.समरजितसिंह घाटगे यांच्या विजयासाठी बहुजन समाजातील जनताच शर्थीचे प्रयत्न करून त्यांना विजयी करेल असे सांगताच उपस्थित असलेल्या सर्वांनीच टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या वक्तव्याला दाद दिली.
.