*ऋतुराज पाटलांकडून शहरातील मध्यवर्ती ठिकाणाकडे दुर्लक्ष – प्रा. जयंत पाटील*
कोल्हापूर – अनेक ब्रँडेड शोरूम मुळे सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनलेले राजारामपुरी हे शहरातील मध्यवर्ती ठिकाण आहे. या भागाकडे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांनी दुर्लक्ष केल्यामुळे येथील मूलभूत समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. असे प्रतिपादन प्रा. जयंत पाटील यांनी केले.
राजारामपुरी येथे आयोजित मिसळ पे चर्चा या कार्यक्रमात ते बोलत होते. गेली अनेक वर्षे काँग्रेसने महापालिकेची सत्ता उपभोगली. मागील पाच वर्षात कोल्हापूर उत्तर व दक्षिण मध्येही त्यांचेच आमदार होते. एवढे असूनही शहरातील महत्त्वपूर्ण ठिकाणांकडे त्यांनी लक्ष दिले नाही. येथील नागरिकांना दिवसेंदिवस पायाभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागतो आहे. कचरा व सांडपाणी व्यवस्थापन या महत्त्वपूर्ण मुद्द्याकडे यांनी लक्ष दिलेले नाही. असे आरोप त्यांनी यावेळी केले.
ते म्हणाले, या परिसरात नागरिकांची सतत गर्दी असते. वाहतूक कोंडी विशेषतः पार्किंगचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. खाऊ गल्लीच्या अवती भवती प्रचंड अस्वच्छता असते. परिसरात धुळीचे साम्राज्य आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे आहे. अशा अनेक छोट्या छोट्या पण मोठ्या परिणामकारक समस्या आहेत. या सर्व समस्यांच्या मुळाशी जाऊन त्यावर उपाय योजणारे नेतृत्च अमल महाडिक आहेत. असे ते यावेळी म्हणाले.
इतकी वर्षे आपण विरोधकांना संधी दिली आहे. पण त्यांनी केवळ सत्तेचा उपभोग घेऊन स्वतःची घरे भरली. आता वेळ आहे. निर्णय घेण्याची, त्यामुळे येत्या २० नोव्हेंबर रोजी कमळ या चिन्हासमोरील बटण दाबून या अकार्यक्षम नेतृत्वाला बाहेरचा रस्ता दाखवूया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी माजी नगरसेवक मुरलीधर जाधव, सत्यजित (नाना) कदम, माजी महापौर दीपक जाधव, ऋतुराज क्षीरसागर, करण जाधव, शिवराज जाधव, सोमराज जाधव, पंकज कोकाटे, जितू भोसले, बाळ जामसांडेकर, प्रताप घेवडे, प्रसाद अथने, पिंटू चिमणी, विश्वास कोराने, भाऊ निंबाळकर, पंकज कुरणे, निखिल साळुंखे, भाऊ आमले, श्रीकांत नाटेकर , विजय कांबळे, संग्राम जरग, चौगुले सर, हेमंत बापू पाटील, संजय सावंत, अभिलाष पाटील, राजवर्धन कदम, संतोष शेट्टी, राजा पाटील, अभी भोसले, अमर सावेेकर, तुषार सावेकर, चंद्रकांत सावेकर, अमोल शिंदे, सदानंद मोरे, स्वप्निल जगताप, धनंजय सरदेसाई, संदीप वाडकर, तानाजी हिरगुडे, मंगेश वारके, नरेंद्र मांगलेकर, विघ्नेश आरते, रूपा आगळे, नम्रता साळुंखे, भारतीताई जाधव, सुहास मुदगल, मंदार तपकिरी, अमोल लाड, प्रशांत आडके, बाळू मिस्त्री, सोहन डांगे, सागर कांबळे, हरीश तेंडवानी, राहुल जोशी, यदुराज पाटील, हरीश वायचळ यांच्यासह राजारामपुरी परिसरातील महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.