रोटरीची वृक्षारोपण मोहीम दिशादर्शक : उदय गायकवाड

Spread the news

रोटरीची वृक्षारोपण मोहीम दिशादर्शक : उदय गायकवाड

 

कोल्हापूर ,प्रतिनिधी

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलच्या वतीने राबविण्यात आलेली वृक्षारोपण मोहीम दिशादर्शक आहे. जागतिक तापमान वाढीच्या काळात झाडे लावून ती जगवली पाहिजेत असे प्रतिपादन पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड यांनी केले.

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलच्या वतीने आयोजित वृक्षारोपण मोहिमेच्या प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष संजय भगत होते.

गायकवाड पुढे म्हणाले, तापमान वाढ आणि प्रदूषण होत असताना झाडांचे महत्व जाणून घेणे आवश्यक आहे. रोटरी सारख्या संस्थांचा हा पुढाकार कौतुकास्पद आहे.
रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष संजय भगत यांनी सांगितले की, हनुमान नगर परिसरात ४२५ झाडे लावून ती जगविण्यात येणार आहेत. शिये ग्रामपंचायतीने यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी पांडुरंग पाटील,उपसरपंच प्रभाकर काशीद यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविक प्राचार्य डॉ .महादेव नरके यांनी केले तर आभार सेक्रेटरी रवी खोत यांनी मानले.

यावेळी शिये सरपंच शीतल मगदूम, ग्रामपंचायत सदस्य बाबासो बुवा,जयसिंग फडतारे ,तेजस्विनी पाटील,
रोटरी सेंट्रलचे खजानिस निलेश पाटील, उद्योजक अविनाश चिकणीस, प्रकाश जगदाळे, संदीप साळोखे, संजय कदम, विशाल पाटील,आर.वाय.पाटील , नरेश शिंगाडे ,चंद्रकांत थोरात, डॉ.हणमंत पाटील, राहुल माने ,पंडित गाडवे व ग्रामस्थ,रोटरॅक्टर मोठ्या संखेने उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!