-
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन, मोरया हॉस्पिटल आणि दत्तकृपा क्लिनीकच्या पुढाकारातून आरकेनगर आणि चंबूखडी इथल्या मातोश्री वृध्दाश्रमात आरोग्य शिबिर
कोल्हापूर
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन, मोरया हॉस्पिटल आणि दत्तकृपा क्लिनीकच्या पुढाकारातून, आर के नगर आणि चंबूखडी इथल्या मातोश्री वृध्दाश्रमात आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं. या शिबिरात शंभरपेक्षा अधिक वृध्दांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. तसंच आवश्यकतेनुसार गरजू रूग्णांना मोफत औषधं देण्यात आली.
कोल्हापुरातील आर के नगर इथल्या शिवाजी पाटोळे संचलित मातोश्री वृध्दाश्रमात ६० वृध्द राहतात. या वृध्दाश्रमाच्या अनेक अडचणी आहेत. वृध्दांच्या प्रकृतीच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या नूतन अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांच्या पुढाकारातून, आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं. रोटेरियन बाळकृष्ण शिंपुकडे, रोटेरियन प्रतिभा शिंपुकडे, साहील शिकलगार, दिग्विजय पाटील तसंच मोरया हॉस्पिटलच्या मेडीकल ऑफिसर डॉ. सानिया धनवडे, निकिता जाधव, गणेश पाटील, शंकर पाटील यांच्या पुढाकारातून आज हे शिबिर पार पडलं. रोटरी क्लब ही जगभरातील सामाजिक क्षेत्रात काम करणारी अग्रेसक संस्था आहे. मातोश्री वृध्दाश्रमासाठी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीनं सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल, असं शिंपुगडे यांनी सांगितलं. वृध्दाश्रमाचे संचालक ऍड. शरद पाटोळे आणि शिवाजी पाटोळे यांनी वृध्दाश्रमाची उभारणी आणि अडीअडचणींबाबत माहिती दिली. दरम्यान या वृध्दाश्रमातील सर्व वृध्दांची आरोग्य तपासणी करून, गरजेनुसार औषधंही देण्यात आली. यावेळी जयश्री चौधरी, बबन माने उपस्थित होते. दरम्यान चंबुखडी इथल्या मातोश्री वृध्दाश्रमातही अशाच प्रकारे आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं होते. बी एस शिंपुगडे, प्रतिभा शिंपुगडे, शिंगणापूरच्या उपसरपंच सुवर्णा आवळे, उपसरपंच रूपाली चौगले, स्वाती कांबळे, ग्रामपंचायत सदस्या स्वाती पाटील, संगीता कलाल, स्मिता पाटील, दत्ता आवळे, वृध्दाश्रमाच्या अध्यक्षा वैशाली राजशेखर, सुर्यप्रभा चिटणीस यांनी मनोगत व्यक्त केलं. तर डॉ. विजय पाटील, डॉ. सुप्रिया पाटील यांनी वृध्दांची वैद्यकीय तपासणी केली. शिवाय त्यांना दोन महिन्याची औषधं मोफत देण्यात आली. यावेळी शिवानी पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.