- रोटरी सेंट्रल कडून गांधीनगर वसाहत रुग्णालयास दोन आर.ओ.वॉटर फिल्टर प्रदान
जागतिक जल दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल यांच्या वतीने गांधीनगर वसाहत रुग्णालय येथे दोन युनिट आर.ओ. वॉटर फिल्टर भेट देणेत आले. १ लाख १० हजार
प्रास्ताविकात रोटरी सेंट्रलचे कम्युनिटी डायरेक्टर डॉ महादेव नरके यांनी निरोगी जीवनासाठी स्वच्छ पाण्याचे महत्व विषद केले. ही दोन पाणी युनिट बसवून रोटरी सेंट्रल ने सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे.
वसाहत रुग्णालय गांधीनगर चे वैद्यकीय अधीक्षक डॉ दिलीप वाडकर यांनी रोटरी सेंट्रलने आजपर्यंत केलेल्या उल्लेखनीय समाजकार्याचे कौतुक करताना चांगली रुग्णसेवा देऊन त्यांच्या सहकार्याची परतफेड करण्याची ग्वाही दिली.
क्लब प्रेसिडेंट संजय भगत यांनी महाराष्ट्राची गौरवगाथा या कार्यक्रमातून जमलेल्या मदत निधीतून रुग्णांसाठी येण्याचे पाण्याची व्यवस्था केल्याचे समाधान व्यक्त केले.
असिस्टंट गव्हर्नर रो. राहुल कुलकर्णी यांनी जिथे समाजाला गरज असेल तिथे मदतीसाठी रोटरी तत्पर असल्याचे सांगितले.
त वॉटर फिल्टर चे उदघाटन असी. गव्हर्नर रो. राहुल कुलकर्णी व प्रेसिडेंट रो. संजय भगत यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उद्योजक रो. अविनाश चिकणीस, रो. नरेश शिंगाडे, रवी मोरे, अशोक देवकुळे, वसाहत रुग्णालय गांधीनगरचे किशोर साळोखे,अब्रार काझी,अंकुश कुडेकर , विकास पाटील, सुबोध कांबळे, चेतन काळे, गीता गुरव,अधीपरिचारिका रुपाली चव्हाण,विद्या जाधव , रुदा काळे, दिपाली फोंडे, कलेऱा चोपडे, विकास शिरसे , असी. मेट्रन मंगल चव्हाण, परिसेविका ज्योती बनसोडे, डॉ दिपाली माने, डॉ बिना रुईकर,,डॉ आशिष काळे,डॉ देवेंद्र थोरात,डॉ वर्षा खर्डे,डॉ. संपत सावंत, डॉ हेर्लेकर, डॉ सुतार प्रदिप,डॉ राजदीप, अमोल यादव व सर्व कर्मचारी-अधिकारी उपस्थित होते.
या सूत्रसंचालन डॉ स्मिता बचाटे यांनी केले तर आभार औषध निर्माण अधिकारी गोरखनाथ खाडे यांनी मानले