मंडलिकांची भूमिका अपरिपक्वपनाची

व्ही बी पाटील यांचा आरोप

Spread the news

 

*प्रा. खा. संजय मंडलिक यांचे विधान अपरिपक्वपनाचे :- व्ही.बी. पाटील*

कोल्हापूर/ प्रतिनिधी

श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना निवडणुकीला उभे करणे हे देशाचे नेते शरदचंद्र पवार यांचे षडयंत्र आहे* अशा पद्धतीचे अपरिपक्वपनाचे विधान खासदार संजय मंडलिकनी केले आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील  यांनी केला आहे

पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, 2009 ची निवडणूक ही सदाशिवराव मंडलिक यांनी एका वेगळ्या वळणावर लढवली हे सर्वांनाच माहित आहे *मंडलिक साहेबांनी आयुष्यभर जातीयवादी पक्षाच्या विरोधात आपला आवाज उठवला* आणि फुले शाहू आंबेडकर विचार शेवटपर्यंत जपला हे जपत असताना *कधीही कुणावर खालच्या पातळीवर टीका केली नाही* हे त्यांचे मोठेपण होते. परंतु  *खासदार संजय मंडलिक यांनी पवार साहेबांच्या वर टीका करून नेमकं स्वतःचं हसू करून घेतला आहे*

मंडलिक यांना उद्देशून पत्रकात पुढे म्हटले आहे की, आपण पूर्णतः जातीयवादी पक्षाच्या वळसचनीला जाऊन बसला आहात. हा दोष तुमचा आहे. अजूनही आपली उमेदवारी जाहीर केली नाही हे *भाजपचे षडयंत्र आपल्याला ओळखता आले नाही*

*देश आणि फुले शाहू आंबेडकर यांचे विचार अडचणीत असताना* छत्रपती शाहू महाराज हे स्वतःहून निवडणुकीला उभारण्याचा निर्णय घेतला आहे *महाराज कोणीतरी सांगितल्यामुळे निवडणूक लढवतील एवढे ते अपरिपक्व नाहीत* आपण विचार करायला हवा *पवार साहेबांच्या मनात असे काही असते तर त्यांनी स्व. खासदार सदाशिवराव मंडलिकसाहेबांच्या नावाने देणाऱ्या पुरस्काराच्या वेळी आपण आयोजित केलेल्या प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावरील व्यासपीठावर हजेरी लावली नसती* त्यावेळेस तो विषय संपला होता हे कळाले नाही याचे आश्चर्य वाटते

*छत्रपती शाहू महाराज आणि मंडलिक  यांचे व्यक्तिगत संबंध सर्वश्रुत आहेत* दोघांनीही एकमेकांवर अगदी मनापासून नुसतेच प्रेम केले नाही तर फॅमिली रिलेशन पण निर्माण केले *मंडलिक साहेबांच्या प्रत्येक घरगुती कार्यक्रमात स्वतः जातीने उपस्थित राहणारे छत्रपती शाहू महाराज आम्ही पाहिलेत अनुभवले आहेत* आजही मंडलिक घराण्या विषयी महाराजांच्या मनात नितांत आदर आहे आणि याचाही अनुभव आपणास वेळोवेळी आलेला आहे असे असताना असे विधान करणे योग्य नाही असेही पाटील यांनी म्हटले आहे.

 

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!