कोल्हापूर/प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय मातृ दिवस आज साजरा करत असताना माता भगिनींनी आपल्या आरोग्यावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे हे जग तिच्यामुळेच उभे आहे तिच्या अंतर्मनामध्ये अनेक शक्ती वास करत आहेत या शक्ती तिने ओळखल्या पाहिजेत. पुरुषांच्या शरीरात पंचमहाभूत शक्ती आहे तर महिला अंबामातेच्या स्वरूपात आहे. प्रेम,करुणा आणि वात्सल्य शांती सात्विक संवेदना तिच्या कडे आहे म्हणूनच ती जननी आहे असे उदगार परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराज यांनी काढले. जागतिक महिला दिनानिमित महिला पतंजली योग समिती महाराष्ट्र यांच्या वतीने गांधी मैदान येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
महाराष्ट्रातील माता भगिनींसाठी राज्यस्तरीय महासंमेलन व कुंकूमार्चन सोहळा आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी रामदेव महाराज यांनी महिलाना मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना रामदेव महाराजांनी स्वदेशीचे व्रत घेऊ, विदेशी उत्पादन मुळे देशाचा पैसा विदेशात जातो. त्यामुळे स्वदेशी शिका स्वदेशी वस्तू वापरा स्वदेशी चिकित्सा स्वदेशी संस्कृती यांचे जतन करा गायमातेची पूजा करा यातून मोठ्या संकल्पची पूर्ती होते असे सांगून प्रत्येक घराला गावाला रोगमुक्त करणार असा शुभ संकल्प केला.
भारतीय उत्पादने स्वस्थ आणि गुणवत्ता पूरक आहेत अलीकडे औषधांचा भडीमार शरीरावर होत चाललेला आहे मात्र याचे विपरीत परिणाम भोगावे लागत आहेत त्यामुळेच आयुर्वेदाकडे वळणे आवश्यक आहे असेही परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराज म्हणाले.
संसारातील वंशपरंपरा वाढविण्यासाठी स्त्री आईच्या रूपात समोर येते अनेक रूपे ती निभावत असते. अलीकडे ती तिच्या शरीराकडे दुर्लक्ष करत चालली आहे म्हणूनच तिने योगावर अधिक भर दिला पाहिजे तिच्यावर अवलंबून असणाऱ्या जबाबदाऱ्या तिला पार पाडायच्या असतील तर तिला रोगमुक्त जीवन जगणे आवश्यक आहे. ज्ञान आहे तर सर्व काही चुकीच्या पद्धतीने इतिहास सर्व विषय शिकविले जात आहेत म्हणूनच चांगले ज्ञान मिळाले तरच चांगली पिढी घडणार आहे. आज डोनाल्ड ट्रम्प च्या पद्धतीने वागत आहेत त्यामुळे मानवतेचे नुकसान होणार आहे.मात्र भारत हा अध्यात्मिक आणि आर्थिक क्षेत्रात पुढे जात आहे. असे सांगून त्यांनी महिलांना निरोगी राहण्यासाठी योगा करा आणि रोगमुक्त जीवन जगा असा संदेश दिला.स्वामीजींनी योग आयुर्वेद स्वदेशीकांतील स्वदेशी क्रांती, स्वदेशी शिक्षा, गुरुकुल शिक्षण, स्वदेशी चिकित्सा, शिक्षणप्रसार भारत वासिंयांनी लोकांना स्वस्त, समृद्ध, आध्यात्मिक जीवन जगण्याचे मार्गदर्शन केले.
पूज्य साध्वी देवप्रियाजी यांनी बोलताना आजच्या धकाधकीच्या काळात महिलांच्या अनेक समस्या आहेत महिला या मुख्य मातृशक्ती आहेत. त्यांनी स्वतः चांगले विचार चांगले शिक्षण शिकून आपल्या मुलांना शिक्षित केले पाहिजे घडवले पाहिजे असे सांगून भारतीय संस्कृती, भारतीय शिक्षण पद्धती, आरोग्य निरोगी राहण्यासाठी योग अशा विविध गोष्टीवर मार्गदर्शन केले.
यावेळी स्वागत पर भाषण करताना खासदार धनंजय महाडिक यांनी बोलताना आज महिला दैनंदिन जीवनामध्ये आणि बाहेरील कामांमध्ये इतक्या व्यस्त झाले आहेत की त्यांच्याकडून आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली जात नसल्याचे लक्षात येत आहे. त्यांना जागतिक महिला दिनानिमित्त मार्गदर्शन मिळावे यासाठी परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराज यांना कोल्हापूर नगरीत आणण्यात आले आहे असे सांगितले.
यावेळी प्रास्तविक महाराष्ट्र राज्य महिला वरिष्ठ महिला राज्य प्रभारी सुधा अळळीमोरे यांनी केले.भागीरथी महिला संस्था अध्यक्ष सौ.अरुंधती महाडिक , सन्मती मिरजे पतंजली योग समिती कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्ष छाया पाटील,प्रमोद पाटील अध्यक्ष, हिल रायडर्स, महाराष्ट्रातील समस्त पतंजली योग परिवार आदींनी सहकार्य केले.
चौकट :
कुंकूमार्चन सोहळ्यात दहा हजार महिलांनी सहभाग नोंदवला यावेळी सुहास जोशी आणि स्वप्निल मुळे यांनी महिलांना मंत्रोच्चार पठणाद्वारे कुंकुमार्जन सोहळ्यात मार्गदर्शन केले कुंकुमार्चन कौटुंबिक सुख सौभाग्य आणि शत्रु बाधा नाहीशी होणे यासाठी महत्वाचे मानले जाते आज जागतिक महिला दिनादिवशी
महिला पतंजली योग समिती महाराष्ट्र यांच्या वतीने कोल्हापूर मधील गांधी मैदान येथे हा सोहळा पार पडला.याचे नेतृत्व भागीरथी महिला संस्था अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांनी केले होते.
चौकट :
या सोहळ्यात कोल्हापूर मध्ये कुमारी मुलींना पूजन कार्य केले जाते म्हणून आज जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित या कुंकुमार्चन सोहळ्यात च्या निमित्ताने कुमारी मुलींचे पूजन बाबा रामदेवजी महाराज
पूज्य साध्वी देवप्रियाजी,
आणि खासदार धनंजय महाडिक,सौ अरुंधती महाडिक आणि पतंजली भारतीय प्रसार मंडळ चेअरमन श्री एन. पी. सिंग,स्वामी भारतजी आदींनी केले.
चौकट :
करो योग रहो निरोग, घर घर हम जायेंगे सबको हम योग सिखायेंगे,रोज करो कपालभाती
नही रहेगी रोग की भीती असे संदेश फलक लक्षवेधी ठरले.
चौकट :
जागतिक महिला दिनानिमित्त आज गांधी मैदान महिलांच्या संख्येने तुडुंब भरले होते निमित्त होते कुंकुमार्चन सोहळ्याचे महिलांना परम पूज्य स्वामी रामदेव महाराज यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.