ऋतुराज पाटील यांच्या पाठीशी भक्कम उभे राहा सतेज पाटील यांचे आवाहन
कोल्हापूर
दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार ऋतुराज पाटील यांनी केलेले ज्येष्ठांसाठी व युवक युवतींसाठी केलेल्या विकास कामाच्या जोरावर येत्या विधानसभा निवडणुकीत आमदार ऋतुराज पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले. साने गुरुजी येथील आमदार ऋतुराज पाटील यांच्या फंडातून साकारलेल्या अभ्यासिकेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, ‘कोल्हापूरला आयटी क्षेत्र उभारण्यासाठी प्रयत्नशील असून, यासाठी शेंडा पार्क येथील ७५ एकर जागा आरक्षित ठेवण्यात यावी, यासाठी प्रस्ताव देण्यात आला आहे. एमआयडीसीच्या धरतीवर कमी खर्चात आयटी कंपनींना जागा उपलब्ध करून देण्यात यावी. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून सुमारे साडेसात हजार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. स्पर्धात्मक परीक्षेची तयारी व्हावी व उपनगरातूनही तरुण-तरुणी अधिकारी बनावेत, यासाठी दक्षिण विभागात पाच अभ्यासिकेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी चार कोटी चा निधी उपलब्ध आहे.
शाहू अध्यासन केंद्राचे डॉक्टर जे. के. पवार यांनी प्रास्ताविकामध्ये अभ्यासिकेचे महत्व व हेतू स्पष्ट केला.
यावेळी व्यासपीठावर माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, दुर्वास बापू कदम, भुपाल शेटे, मच्छिंद्रनाथ देशमुख, संपतराव गायकवाड, सदानंद कवडे, सुयोग वाडकर, अभिजीत चव्हाण, गुरुप्रसाद जोशी आदी उपस्थित होते.
अभ्यासिकेला श्री. वसंतराव जयवंतराव देशमुख यांचे नाव
विद्येचे मंदिर उभारणाऱ्या श्री वसंतराव जयवंतराव देशमुख यांचे नाव अभ्यासिकेला देण्यात यावे, असा प्रस्ताव दिला. त्यास तातडीने आमदार सतेज पाटील यांनी मान्यता दिली.