‘रेड रन’ स्पर्धेत ओंकार अर्दाळकर,पुजा नवलाज प्रथम* _*एड्स नियंत्रण विभागामार्फत गडहिंग्लज येथे जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा संपन्न *_

Spread the news

  • *’रेड रन’ स्पर्धेत ओंकार अर्दाळकर,पुजा नवलाज प्रथम*
    _*एड्स नियंत्रण विभागामार्फत गडहिंग्लज येथे जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा संपन्न *_
  • कोल्हापूर

जिल्हा एड्स नियंत्रण विभाग, सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर मार्फत गडहिंग्लज येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘रेड रन मॅरेथॉन ‘ स्पर्धेत मुलांमध्ये शिवराज महाविद्यालय गडहिंग्लज चा ओंकार विजय अर्दाळकर याने तर घाळी कॉलेज गडहिंग्लज ची पूजा मल्लाप्पा नवलाज हिने मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला . गडहिंग्लज उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले, उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज चे वैद्यकीय अधीक्षक डॉ.चंद्रकांत खोत, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर, गडहिंग्लजचे पोलिस निरीक्षक गजानन सणगर ,लायन्स क्लबचे प्रेसिडेंट रफिक पटेल, डॉ.पी.पी.पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धा संपन्न झाली.
१२ ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर युवकांमध्ये एचआयव्ही,एड्स जनजागृती व्हावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
युवकांनी एचआयव्ही जनजागृतीचे ‘दुत’ बनून नवीन एचआयव्ही संसर्गितांची आकडेवारी शून्य आणण्यासाठी रेड रिबीन क्लबमध्ये सामील व्हावे असे आवाहन जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी केले.
एड्स मुक्तीची शपथ घेऊन, मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.विजेत्यांना मेडल, प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेचे पंच म्हणून प्रा.संतोष बाबर, विकास अतिग्रे,संपत सावंत, प्रकाश हारकारे, दयानंद गवंडी, सुभाष तिप्पे यांनी काम पाहिले.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील, डॉ.जीवन पाटील, मकरंद चौधरी,विनायक देसाई, कपिल मुळे, संदिप पाटील, भगवान कुंभार,दीपक सावंत, संजय गायकवाड, उदय किल्लेदार, प्रणव सटाले,रमेश कुलकर्णी,शिल्पा अष्टेकर,श्रीया पाटील,अश्विनी पाटील व,ताहेर शेख,वर्षा रोटे, संदिप पाटील,विकास माने, प्रशांत पाटील,विठ्ठल सासुलकर इत्यादी उपस्थित होते.
सुत्रसंचलन विनायक देसाई यांनी केले तर आभार डॉ.पद्मजा गावडे यांनी मानले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!