निव्वळ राजकीय बदनामीसाठीच रवीकिरण इंगवले यांचा खेळ सुरू आहे: सुजित चव्हाण
कोल्हापूर
राजकीय स्टंटबाजी पोटी रविकिरण इंगवले यांनी काल पत्रकार परिषद घेतली. या परिषदेतून त्यांचा निव्वळ राजेश क्षीरसागर यांच्या विरोधातील द्वेष दिसून आला. यासह त्यांचा बालिशपणाही जनतेला कळाला. निविदा प्रक्रिया राबविताना डीन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असते. ही समिती शासकीय साहित्यांची खरेदी विक्री प्रक्रिया राबवण्याचे सर्व निर्णय घेत असते आणि त्या आधारे साहित्यांची खरेदी केली जाते. याची माहीती रवीकिरण इंगवले यांना नसल्याने बिनबुडाचे आरोप केलेले आहेत. या खरेदी प्रक्रियेत काय गैर व्यवहार झाला असल्यास शासन आपल्या स्तरावर योग्य ती कार्यवाही करेल असे पत्र शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी प्रसिद्ध दिले आहे.
श्री. राजेश क्षीरसागर यांच्या कार्यालयात हजारो पत्रे दिली जातात. त्यांच्याकडे अनेक व्यक्ती पत्राची मागणी करतात. अशा अनेक प्रकरणात बऱ्याच लोकप्रतिनिधीनी पत्रे दिले आहेत त्याचप्रमाणे राजेश क्षीरसागर यांनीही पत्र दिलं. राजेश क्षीरसागर यांच्याकडे कोण चोर कोण गुन्हेगार याची चौकशी करायला वेळ नाही नाहीतर इंगवले सारखे गुंड कधीच शिवसेना शहर प्रमुख झाले नसते.
वास्तविक पाहता राजेश क्षीरसागर यांच्या साध्या पत्रावरून निधी मंजूर होतो हीच क्षीरसागर यांची कार्य तत्परता रवीकिरण इंगवले यांनी सिध्द केली. पण जर भ्रष्टाचार झाला असेल तर त्याच्यावर योग्य ती कार्यवाही होईल.
2019 च्या निवडणुकीपूर्वी श्री. राजेश क्षीरसागर यांच्या कामाचा डौलारा व विकास कामाचा डोंगर पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली होती. राजेश क्षीरसागर यांना हरवता येणार नसल्याने त्यांच्या बदनामीचा डाव आखला गेला. सध्याची परिस्थिती पाहता पाच वर्षे अखंड जनसेवा कोट्यावधी रुपयांचा विकास निधी राजेश क्षीरसागर यांनी मंजूर केला आहे. राजेश क्षीरसागर यांच्यासमोर सक्षम असा उमेदवार विरोधकांकडे नाही. त्याचमुळे त्यांच्या बदनामीचे कारस्थान विरोधकांकडून होत आहे. पण जनता सुज्ञ असून लोकांच्या अशा कटकारस्थान यांना भिक घालणार नाही.
आमच्यासाठी आनंदाची बाब अशी आहे की इंगवले प्रसिद्धीसाठी नेत्यांवर टीका करत असतात. त्यांनी पहिला मालोजीराजे छत्रपती यांच्यावर टीका केली यासह खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील यांच्यावरही टीका केली. आता हा राजेश क्षीरसागर यांच्यावर टीका करत आहेत. पण हे सर्व जण राजकीय कार्यकीर्दीत यशस्वी झालेले आहेत. त्यामुळे सुज्ञ आहे आणि अश्या आरोपांना जनता भीक घालत नाही.