कोल्हापूर: राष्ट्रीय लिंगायत संघ भारत यांच्या वतीने रविवार दि. २ मार्च रोजी कोल्हापुरात लिंगायत शरण संगम, वधूवर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दसरा चौकातील चित्रदूर्ग मठ येथे हा मेळावा होणार आहे. कोल्हापूर लिंगायत समाज संस्था व बसव केंद्र यांच्या सहकार्याने हा मेळावा होणार आहे.
सकाळी अकरा वाजता होणाऱ्या या मेळाव्याचे अध्यक्षस्थान माजी मंत्री, आमदार डॉ. विनय कोरे हे भुषविणार आहेत. यावेळी दत्त शिरोळ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील, सरलाताई पाटील, अशोक स्वामी, लिंगायत माळी समाजाचे जिल्हाध्यक्ष गुरुबाळ माळी, सागर कस्तुरे, शिवराज शेटकार,गजानन सुलतानपुरे, बसवराज आजरी, राजेंद्र कुंभार हे उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय लिंगायत संघाचे अध्यक्ष प्रदीप वाले यांनी केले आहे.