मनोज जरांगे पाटील यांची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या आवाडे ना मतदान करू नका
रामभाऊ गायकवाड यांचे आवाहन
इचलकरंजी : विधानसभेमध्ये प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना एस.आ. टी ची चौकशी लावा, अशी मागणी केली होती. त्याला इचलकरंजीचे विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांनी टेबल वाजून समर्थन केले होते. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांचे समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी इचलकरंजी शहरात येऊन एस. आय. टी चौकशीला समर्थन करणाऱ्या आमदार आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांना विधानसभेला मराठा समाजाने मतदान करू नये असे, आवाहन रामभाऊ गायकवाड यांनी केले. मराठा योद्ध मनोज जरागे पाटील यांच्या सूचनेनुसार त्यांचे समन्वयक रामभाऊ गायकवाड इचलकरंजीच्या दौर्यावर आले होते. यावेळी सुरुवातीला इचलकरंजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्याआधी जरांगे पाटील यांचे समर्थक यांनी जोरदार घोषणाबाजी केली. एक मराठा लाख मराठा , छत्रपती शिवाजी महाराज कि जय, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाच अश्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सन २०२३ पासून मराठा समाज्यास आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरु होते. त्यावेळी उपोषण स्थळी पोलिसांकडून लाठी चार्ज झाला. त्या घटनेनंतर राज्य भर याचे पडसाद उमटले होते. त्या दरम्यान , राज्यभरात जरांगे पाटील यांनी दौरा केला. समाजाकडून विविध ठिकाणी त्यांना जेसीबीद्वारे फुलांचा वर्षाव केला जात होता. त्यानंतर समाजा मार्फत विविध ठिकाणी मोठमोठ्या सभा जरांगे पाटील यांच्या होत होत्या. यासाठी जरागे यांच्या कडून एवढ्यामोठ्या प्रमाणात पैसा कोठून येतो यासंदर्भात विधानसभेमध्ये मंत्री प्रवीण दरेकर यांनी जरांगे पाटील यांच्या वर एस.आय.टी लावावी, अशी मागणी केली होती. यावर आमदार प्रकाश आवाडे यांनी टेबल वाजून त्या मागणीला समर्थन केले होते. याचा निषेध म्हणूनच आम्ही याठिकाणी आलो असून विद्द्मान आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांना मराठा समाजाने मतदान करू नये, असे आवाहन केले. यासह आमचा या विधानसभा मतदार संघामध्ये कोणालाही आमचा पाठिंबा नाही, असे नमूद केले. यावेळी प्रवीण केर्ले, अजय डूगल, अवधूत खोत, रणजीत शिंदे, सचिन पाटील यांच्यासह जरांगे पाटील यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.