कोल्हापूरची जनता महायुतीच्या बाजूने
राजेश क्षीरसागर
*खास.प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ महायुती पदाधिकाऱ्यांची “मिसळ पे चर्चा”*
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने “अब की बार ४०० पार” चा नारा दिला आहे. मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करून राज्यात महायुतीच्या सर्वच उमेदवारांना विजयी करण्यासाठी मतदार सज्ज झाले आहेत. राज्यात झालेले विकासाचे, जनहिताचे काम पाहता जनता महायुतीच्या पाठीशी ठाम उभी आहे असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
महायुतीचे शिवसेना उमेदवार खास.प्रा.संजय मंडलिक यांच्या प्रचार शुभारंभाच्या अनुषंगाने शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, शनिवार पेठ, कोल्हापूर येथे “मिसळ पे चर्चा” पार पडली. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांनी आगामी काळात प्रचार फेरी, कॉर्नर सभा, प्रभागवार बैठका, अंगीकृत संघटनाचे मेळावे, पोलिंग बूथप्रमुख आदी बाबींची माहिती व सूचना उपस्थित महायुती पदाधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी बोलताना क्षीरसागर यांनी, कोल्हापूर जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. अपवाद वगळता कोल्हापूर शहरानेही कायमच शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार शिवसेनेच्या भगव्याला साथ दिली आहे. पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांचे देशातील विकासाचे काम, तर मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांचे राज्यातील जनहिताचे काम हेच आमच्या प्रचाराचे मुख्य अस्त्र असणार आहे. या कामाची शिदोरी घेवून महायुतीचे शिलेदार मतदारांपर्यंत जात आहेत.
यावेळी बोलताना खासदार प्रा.संजय मंडलिक म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला शहराने नेहमीच साथ दिली आहे. त्यामुळे याहीवेळी शहरवासीय शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभे राहतील.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, भाजप प्रदेश सचिव महेश जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष आदिल फरास यांनीही मनोगते व्यक्त केली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सदस्य राहुल चिकोडे, आर.पी.आय जिल्हाध्यक्ष सोमनाथ घोडेराव, युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर, सत्यजित उर्फ नाना कदम, अशोक देसाई, प्रकाश गवंडी, राहुल चव्हाण, उत्तम कोराणे, नंदकुमार मोरे, किशोर घाटगे, रमेश खाडे, उदय भोसले, तुकाराम साळोखे, महेंद्र घाटगे, सुनील जाधव, शिवसेना महिला आघाडीच्या मंगल साळोखे, अमरजा पाटील, पवित्रा रांगणेकर, भाजपच्या रूपराणी निकम, गायत्री राऊत, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रेखा आवळे आदी महायुती पदाधिकारी उपस्थित होते.